‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘रमा राघव’ मालिका ही सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. लवकरच मालिकेतील रमा-राघव पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहे. हा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे. याचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच या मालिकेतील एक अभिनेत्री ‘झी मराठी’वर सुरू होणाऱ्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या नव्या मालिकेत झळकणार आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या नव्या आगामी मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये ‘रमा राघव’ मालिकेतील लावण्या परांजपे म्हणजेच अभिनेत्री शीतल क्षीरसागर झळकली. शीतल या मालिकेत लीलाच्या मावशी आईच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. लीला या मालिकेतील प्रमुख भूमिका आहे.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

हेही वाचा – पूजा सावंत नवऱ्याबरोबर निघाली फिरायला, त्याआधी आईच्या हातच्या ‘या’ खास पदार्थाचा घेतला आस्वाद

अभिनेत्री शीतल क्षीरसागरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, यापूर्वी ‘झी मराठी’च्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेत तिने काम केलं होतं. या मालिकेत ती सिम्मीच्या भूमिकेत झळकली होती. तिची ही भूमिका खूप हिट झाली होती.

हेही वाचा – लग्नाच्या सात दिवसांनी तितीक्षा तावडे परतली कामावर, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या सेटवर ‘असं’ झालं स्वागत

दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत राकेश बापट हा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसेच वल्लरी विराज, सानिका काशिकर, भुमिजा पाटील, शर्मिला राजाराम शिंदे असे बरेच कलाकार झळकणार आहेत. अद्याप ही मालिका कधीपासून आणि कोणत्या वेळेत सुरू होणार हे गुलदस्त्यात आहे.

Story img Loader