अभिनेत्री ऐश्वर्या शेटे व अभिनेता निखिल दामले यांची प्रमुख भूमिका असलेली ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘रमा राघव’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने निभावलेलं पात्र घराघरात पोहोचलं आहे. विशेष म्हणजे मनोरमा व राघवचं जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. अशातच या मालिकेतील एका अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकल्याचं समोर आलं आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील गौरी-जयदीपचा होणार पुनर्जन्म; लवकरच मालिका घेणार २५ वर्षांची लीप

‘रमा राघव’ या मालिकेतील अश्विनी हे पात्र साकारलेल्या अभिनेत्रीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. अभिनेत्री सोनल पवारने समीर पालुष्टेबरोबर काल गुपचूप साखरपुडा उरकला आहे. साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुळे सध्या कलाकार मंडळींसह सोनलचे चाहते शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने गायली श्रेया घोषालने गायलेली अंगाई, कलाकार मंडळीसह चाहत्यांनी केलं कौतुक

सोनलचा होणार नवरा समीर पालुष्टे कोण आहे?

सोनलचा होणार नवरा समीर पालुष्टे हा एक व्यावसायिक आहे. तो स्पार्कल्स मीडियाचा फाऊंडर व सीईओ आहे. तसेच समीर डिजीटल मार्केटर व ब्रँड कन्सलटंट म्हणून काम करतो. विशेष म्हणजे सोनलच्या होणाऱ्या नवऱ्याला भारत सरकारच्या निवडणूक आयोगाकडून पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा – विराट कोहलीने केलं ४९वे वनडे शतक; अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “स्वतःच्या वाढदिवसाला…”

हेही वाचा – Video: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील लोकप्रिय अभिनेत्याची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत एंट्री; पाहायला मिळणार महत्त्वाच्या भूमिकेत

दरम्यान, सोनलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘रमा राघव’ व्यतिरिक्त ‘तुला पाहते रे’, ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ या मालिकेमध्ये काम केलं आहे. तिची ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील रुपालीची भूमिका चांगलीच गाजली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rama raghav fame sonal pawar engagement with sameer paulaste photo and videos viral pps