‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर काल, १७ जूनपासून ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता समीर परांजपे यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका रात्री ९ वाजता प्रसारित होतं आहे. या नव्या मालिकेत अनेक नवे, जुने चेहर झळकले आहेत. यामध्ये ‘कलर्स मराठी’च्या ‘रमा राघव’ मालिकेतील एक अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रमा राघव’ ही ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. अभिनेत्री ऐश्वर्या शेटे व अभिनेता निखिल दामले यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीस पसंतील उतरली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने निभावलेलं पात्र घराघरात पोहोचलं आहे. विशेष म्हणजे मनोरमा व राघवचं जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. अशी ही लोकप्रिय मालिका अश्विनी पात्र साकारणारी अभिनेत्री सोनल पवारने गेल्या वर्षी सोडली. त्यानंतर तिनं गुपचूप साखरपुडा उरकला. मग २८ डिसेंबरला मोठ्या थाटामाटात सोनलनं समीर पालुष्टबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या पाच महिन्यांनंतर सोनल पुन्हा कामाला लागली आहे.

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २ : द रुल’च्या प्रदर्शनाची तारीख बदलली, विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाशी होणार टक्कर?

लग्नानंतर सोनलची ‘स्टार प्रवाह’ परिवारात दमदार एन्ट्री झाली आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नव्या मालिकेत सोनल झळकली आहे. तेजस प्रभूच्या (समीर परांजपे) मोठ्या भावाच्या बायकोची भूमिका सोनलने साकारली आहे. मालिकेच्या दुसऱ्या भागात ती तेजसला लग्नासाठी एका सुंदर मुलीचा फोटो दाखवताना पाहायला मिळत आहे.

सोनलचा नवरा समीरने इन्स्टाग्राम स्टोरीवर मालिकेतला तिचा व्हिडीओ शेअर करून खास शुभेच्छा दिल्या आहेत. “नवी सुरुवात, ऑल द बेस्ट बायको”, असं समीरने इन्स्टा स्टोरीवर लिहिलं आहे. दरम्यान, सोनलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं ‘रमा राघव’ व्यतिरिक्त ‘तुला पाहते रे’, ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ या मालिकेमध्ये काम केलं आहे. तिची ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील रुपालीची भूमिका चांगलीच गाजली होती.

हेही वाचा – Video: ‘अंगारों’ आणि निळू फुलेंच्या गाण्याच्या मॅशअपवर मराठमोळ्या प्राजक्ता कोळीचा जबरदस्त डान्स, श्रीवल्लीने केलं कौतुक

सोनलचा नवरा समीर पालुष्टे कोण आहे?

सोनलचा नवरा समीर पालुष्टे हा एक व्यावसायिक आहे. तो स्पार्कल्स मीडियाचा फाऊंडर व सीईओ आहे. तसंच समीर डिजीटल मार्केटर व ब्रँड कन्सलटंट म्हणून काम करतो. विशेष म्हणजे सोनलच्या नवऱ्याला भारत सरकारच्या निवडणूक आयोगाकडून पुरस्कार मिळाला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rama raghav fame sonal pawar entry in thoda tuza ani thoda maza star pravah new serial pps