‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’नंतर ‘अंतरपाट’, ‘अबीर गुलाल’ या नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्या आहेत. असं असलं तरी ‘कलर्स मराठी’च्या जुन्या मालिकांनी प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘रमा राघव’ मालिका.
हेही वाचा – Video: ऑनस्क्रीन मायलेक ऐश्वर्या नारकर व अजिंक्य ननावरे यांनी एकमेकांचं काढलं चित्र, पाहा व्हिडीओ
जानेवारी २०२३मध्ये सुरू झालेल्या ‘रमा राघव’ मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या शेटेने साकारलेली रमा आणि अभिनेता निखिल दामलेने साकारलेला राघव ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसंच मालिकेतल्या इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे आज ‘रमा राघव’ मालिकेनं ४०० भागांचा टप्पा गाठला आहे. ‘रमा-राघव’च्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून उल्हासीतपणे हा दिवस साजरा केला.
हेही वाचा – रुग्णालयात दाखल राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल माहिती; म्हणाली, “गर्भाशयात ट्यूमर असून…”
या मालिकेतील रमा आणि राघव यांच्यावर प्रेक्षकांनी कायमच प्रेम केलं. कधी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, तर कधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दोघांवर अनेक संकटेही आली, मात्र त्या प्रत्येक संकटावर त्यांनी एकमेकांना साथ देत मात केली. प्रत्येक वेळी रमा राघवच्या मागे खंबीरपणे उभी राहिली.
मालिकेत सध्या काय सुरू आहे?
दरम्यान, ‘रमा राघव’ मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणार एक नवं वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर दगड ठेऊन रमा राघवला वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवं वादळ आणणारा होता. त्यांच्या आयुष्यात अद्वैत दादरकर आणि वीणा जगताप या दोन नवीन पात्रांचा प्रवेश झाला आहे. रमा राघवचा सुरू झालेला हा वनवास आणि या पार्श्वभूमीवर या दोघांमुळे अजून कोणते आणि काय होईल ट्विस्ट निर्माण होईल? हे पाहणं खूप मनोरंजनात्मक ठरेल.