रामानंद सागर यांच्या ‘रामायणमधील लक्ष्मण ही भूमिका साकारून अभिनेते सुनील लहरी लोकप्रिय झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील नागरिकांनी भाजपाला मत न दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या भाजपाच्या नेतृत्वाखाली अयोध्येतील राम मंदिराचे जानेवारीमध्ये उद्घाटन झाले होते, त्याच पक्षाच्या उमेदवाराचा ४ जून रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये पराभव झाला. उत्तर प्रदेशमधील फैजाबाद या मतदारसंघात राम मंदिर येतं, याठिकाणी भाजपाचे लल्लू सिंह पराभूत झाले असून ही जागा समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी जिंकली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी सुनील यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर नाराजी व निराशा व्यक्त केली. त्यांनी फैजाबाद मतदारसंघातील निकालाबद्दल अयोध्येतील मतदारांवर टीका केली आहे. “आपण विसरलो की हे तेच अयोध्यावासी आहेत, ज्यांनी सीतामाता वनवासातून परतल्यानंतर त्यांच्यावरही संशय घेतला होता. देव स्वतः जरी प्रकट झाले, तर त्यांनाही नाकारेल इतके स्वार्थी हिंदू आहेत. अयोध्येतील नागरिकांनी आपल्या खऱ्या राजाचा नेहमीच विश्वासघात केला याचा पुरावा इतिहासातही आहे,” असं सुनील लहरींनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बॉलीवूड अभिनेत्रीने प्रचार करूनही हरले तिचे बाबा, पराभवानंतर पोस्ट करत म्हणाली, “ज्यांनी माझ्या वडिलांवर…”

सुनील लहरी यांची पोस्ट

दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “अयोध्येतील लोकांनो आम्ही तुमच्या महानतेला सलाम करतो, तुम्ही तेच आहात ज्यांनी देवी सीतेलाही सोडलं नाही. तर मग प्रभू रामांना त्या छोट्या टेंटमधून एका सुंदर मंदिरात विराजमान करणाऱ्यांचा विश्वासघात करणं तुमच्यासाठी मोठी गोष्ट नाही. संपूर्ण भारत देश तुमच्याकडे पुन्हा कधीही आदराने पाहणार नाही.”

सुनील लहरी यांची पोस्ट

आणखी एका पोस्टमध्ये सुनील लहरी यांनी अयोध्येतील लोकांची तुलना ‘बाहुबली’ मधील पात्र कट्टप्पाशी केली. या चित्रपटात कट्टप्पाने त्यांचा राजा अमरेंद्र बाहुबलीची हत्या केली होती. दरम्यान, लोकप्रिय टीव्ही मालिका ‘रामायण’ मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी भाजपाच्या तिकिटावर मेरठमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. अरुण गोविल मेरठमधून विजयी झाले आहेत, त्याबद्दल सुनील लहरी यांनी आपल्या सहकलाकाराचे अभिनंदन केले आहे.

राज्यात भाजपाचा पराभव का झाला? रामदास आठवलेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “उद्धव ठाकरे व शरद पवारांना…”

फैजाबादमध्ये कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली?

सपाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपा उमेदवार लल्लू सिंह यांचा ५४५६७ मतांनी पराभव केला आहे. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात सपाचे अवधेश प्रसाद यांना ५५४२८९ तर भाजपाच्या लल्लू सिंह यांना ४९९७२२ मते मिळाली. या मतदारसंघात बसपाचे सचिदानंद यांना ४६४०७ मते मिळाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramayan fame sunil lahri disappointed on faizabad loksbha result slams people of ayodhya hrc