१९८७ मध्ये आलेली ‘रामायण’ टीव्ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अरूण गोविल, दिपिका चिखलिया, सुनील लहरी यांनी राम, सीता, लक्ष्मण अशी पात्रं साकारली होती. हनुमान, जामवंत, बाली, लक्ष्मण या पात्रांनाही खूप प्रेम मिळालं होतं. करोना काळात ही मालिका पुन्हा टीव्हीवर दाखवण्यात आली होती. त्यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात याला पसंती दिली आणि तेव्हा ‘रामायण’ मालिकेला सर्वाधिक टीआरपी मिळाला होता. आता याच मालिकेतील लक्ष्मणाची भूमिका साकारलेल्या अभिनेता सुनील लहरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
सुनील लहरी त्यांच्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी राम फळाची ओळख करून दिली. त्यांनी हे फळ पहिल्यांदाच खाल्लं आणि त्याचं महत्त्व सगळ्यांना सांगितलं. तसेच कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिलं, “माता सीतेच्या नावाने सीताफळ आहे आणि श्री रामजींच्या नावाने रामफळ आहे. त्याचप्रमाणे जर लक्ष्मण या नावाचं कोणतं फळ असतं तर किती बरं झालं असतं. पण असो, यावेळी संपूर्ण भारत राममय आहे.”
हेही वाचा… अदा शर्माने नेसली आजीची ६५ वर्षे जुनी साडी; म्हणाली, “माझी आजी जेव्हा २५ वर्षांची…”
‘रामायण’ मालिकेतील कलाकार अरूण गोविल, दिपिका चिखलिया आणि सुनील लहरी हे एकत्रित रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात दिसले होते. त्यानंतर सुनील लहरी हे अरुण गोविलस यांच्यासह प्रयागराजला गेले होते. यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “पीएम मोदींनी रामराज्याची कल्पना पूर्ण केली असून देशातील तरुण पिढीला, संस्कृती आणि प्रभू राम यांच्याशी जोडले आहे. येत्या १० वर्षात देशात बरेच काही बदल घडणार आहेत.”