‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलने अलीकडेच पुण्यात ‘वदनी कवळ’ नावाचं नवीन हॉटेल सुरू केलं आहे. या हॉटेलमध्ये खवय्यांना शुद्ध शाकाहारी पारंपरिक थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. अभिनेत्रीने १९ ऑक्टोबरला या हॉटेलची सुरूवात केली.

हेही वाचा : “सलमान खान खोटारडा…” अभिनेता चंद्रचूड सिंगची ‘ती’ कॉमेंट चर्चेत

shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Madhugandha Kulkarni passed Hemant dhome movie fussclass dabhade
“आपल्या मातीतल्या गोष्टी….”, मधुगंधा कुलकर्णीने ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचं केलं कौतुक; म्हणाली, “‘ॲनिमल’, ‘पुष्पा’ असे…”
Sharayu Sonawane
मालिकांच्या महासंगमाबाबत ‘पारू’ फेम शरयू सोनावणे काय म्हणाली? घ्या जाणून…
‘पारू’ फेम शरयू सोनावणेने नवऱ्याचं केलं कौतुक, म्हणाली, “तो रोमँटिक नाही पण…”
santosh juvekar reveals his experience to working with vicky kaushal in chhaava
“माझी सुट्टी होती, विकीने अचानक सेटवर बोलावून घेतलं अन्…”, संतोष जुवेकरने सांगितला ‘छावा’च्या सेटवरचा अनुभव, म्हणाला…
Marathi actress Prajakta Mali Praised to thet tumchya gharatun drama
“थेट तुमच्या काळजाला हात घालतं…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधल्या कलाकारांच्या ‘या’ नाटकाचं प्राजक्ता माळीने केलं कौतुक, म्हणाली, “ओंकारचं गाणं…”
Maharashtrachi Hasya Jatra nikki tamboli
“मी कोकणात शिमग्याला जातेय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये भन्नाट स्किट सादर करणार निक्की तांबोळी, समोर आला प्रोमो

अनघा अतुल ही पंडित अतुलशास्त्री भगरे यांची मुलगी आहे. अभिनेत्रीने तिच्या भावाच्या साथीने या नव्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ‘रंग माझा वेगळा’ मालिकेशी संबंधित असणाऱ्या अनेक कलाकारांनी अनघाच्या हॉटेलला भेट देत अनेक मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या रेश्मा शिंदेने ‘वदनी कवळ’ श्लोक म्हटला. अभिनेत्रीने यांची खाल झलक व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे. तसेच या पोस्टमध्ये तिने हॉटेलमधील जेवणाच्या चवीविषयी सुद्धा सांगितलं आहे.

हेही वाचा : माधुरी दीक्षितच्या चित्रपटात झळकणार ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री

रेश्मा शिंदेची पोस्ट

आपल्या बिझी शेड्युल मध्ये आपल सतत बाहेरच खाण होत.. मग तुम्हाला कधी अस वाटतं? आत्ता छान घरचं जेवण हवंय.. वाटतं ना? मग पुणेकरांचा हा प्रश्न सुटलाय.. अगदी घराच्या जेवणाची आठवण करु देणारं ‘वदनी कवळ ‘ हे रेसटॉरंट पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज आहे.. सुग्रस आणी सात्विक भोजनाचा आनंद घ्यायचा असेल तर वदनी कवळला नक्की भेट द्या! मी या भोजनाचा आस्वाद घेतलाय तुम्ही सुध्दा ध्या.. तुम्ही निराश होणार नाही याची खात्री आहे…अनघा आणि अखिलेश नवीन व्यवसायासह आपण आपली स्वतःची एक नवीन ओळख तयार करणार आहात. मला तुमचा अभिमान आहे. तुमचे हे नवीन कार्य तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचवणार एक धाडसी पाऊल आहे, याबद्दल तुमचे कौतुक!

अनघा माझी सोबत आणि प्रेम कायमच तुझ्यासोबत आहे.
|| गणपती बाप्पा मोरया ||

PS : मला पूर्ण वदनी कवळ येतं…एखादा शब्द चुकू नये म्हणून हा प्रयत्न!

हेही वाचा : कंगनाच्या फ्लॉप करिअरला ‘तेजस’ देणार नवी उभारी? चित्रपट पहिल्या दिवशी करु शकतो ‘एवढी’ कमाई

दरम्यान, अभिनेत्रीच्या नव्या हॉटेलच्या पोस्टनंतर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Story img Loader