Rang Maza Vegla Actresses Dance : छोट्या पडद्यावरील मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला, तरी या सगळ्या मालिका प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहतात. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अशाच एका मालिकेने जवळपास चार वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेचं नाव आहे ‘रंग माझा वेगळा’. ही मालिका ३० ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जवळपास चार वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने सप्टेंबर २०२३ मध्ये चाहत्यांचा निरोप घेतला.

‘रंग माझा वेगळा’ ( Rang Maza Vegla ) मालिकेतील दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे, श्वेता म्हणजेच अनघा अतुल आणि लावण्या म्हणजेच शाल्मली या अभिनेत्रींचं नुकतंच रियुनियन पाहायला मिळालं. एकत्र आल्यावर या तिन्ही अभिनेत्रींनी सध्या सोशल मीडियावर व्हायरल असलेल्या एका ट्रेडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स केला.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

हेही वाचा : नवरा माझा नवसाचा २ : पहिलं गाणं प्रदर्शित! सचिन व सुप्रिया पिळगांवकरांनी जोडीने धरला ठेका; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

‘रंग माझा वेगळा’ अभिनेत्रींचा जबरदस्त डान्स

“वाटाण्याचा गोल दाना रजे उडू नको टना टना…” हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे गाणं एकनाथ माळी यांनी गायलं आहे. याच ट्रेडिंग गाण्यावर रेश्मा, अनघा आणि शाल्मली यांनी भन्नाट डान्स केला आहे. अनघाने हा व्हिडीओ शेअर करत याला “दीपा, श्वेता, लावण्या यांचा रियुनियन” असं कॅप्शन दिलं आहे.

मालिका संपल्यावरही या तिघींमध्ये सुंदर बॉण्डिंग असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अवघ्या दोन दिवसांतच या अभिनेत्रींच्या डान्स व्हिडीओला जवळपास ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रेश्मा, अनघा अन् शाल्मलीला एकत्र पाहून नेटकऱ्यांच्या मनात ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Rang Maza Vegla
रंग माझा वेगळा फेम रेश्मा अन् अनघा ( Rang Maza Vegla )

हेही वाचा : ‘पिया तू अब तो आजा…’, सदस्यांचा जबरदस्त डान्स अन् घरात झाली दोन नवीन पाहुण्यांची एन्ट्री! कोण आहेत ते? एकदा पाहाच…

हेही वाचा : “साऊथचे कलाकार शिस्तप्रिय अन्…”, तेजस्विनी पंडितने सांगितला अनुभव; दाक्षिणात्य चित्रपटातील जबरदस्त लूक आला समोर

नेटकऱ्यांनी या अभिनेत्रींचा जबरदस्त डान्स पाहून “रंग माझा वेगळा टीम मस्तच”, “लय भारी जमलं”, “सुंदर डान्स” अशा कमेंट्स व्हिडीओवर केल्या आहेत. याशिवाय ‘रंग माझा वेगळा’ ( Rang Maza Vegla ) मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये रेश्मा शिंदे व आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यांच्यासह हर्षदा खानविलकर, अनघा अतुल, अंबर गणपुळे, विदिषा म्हसकर, अभिज्ञा भावे, निखिल राजेशिर्के अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत झळकली होती.

Story img Loader