Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding : मराठी टेलिव्हिजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. कलाविश्वातील हे स्टार कपल नुकतंच लग्नबंधनात अडकलं आहे. या दोघांच्या लग्नाला सिनेविश्वातील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या दोघांच्या लग्न सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शिवानी-अंबरने गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा केला होता. यानंतर दोघांचेही चाहते ही जोडी लग्नबंधनात केव्हा अडकणार याची आतुरतेने वाट पाहत होते. ग्रहमख, मेहंदी, हळद, संगीत सोहळा असे सगळे विधी पार पडल्यावर शिवानी-अंबरने लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते.

Navri Mile Hitlarla
Video: एजे व लीलामध्ये मन्यामुळे दुरावा येणार? नवरा-बायको वेगवेगळ्या टीममधून स्पर्धेत सहभागी होणार, पाहा प्रोमो
Aishwarya Narkar
अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांचा चाहत्यांना आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण सल्ला; व्हिडीओ…
Navri Mile Hitlerla fame raqesh Bapat and vallari viraj eat panipuri on set
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या सेटवर लीला-एजेने पाणीपुरीवर मारला ताव, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “माझ्या रूममध्ये त्या दिवशी…”, प्रितमच्या खुलाशानंतर आदित्य अनुष्काला जाब विचारणार; ‘पारू’ मालिकेत नेमकं काय घडणार?
Bigg Boss 18 Fame actress Yamini Malhotra Struggles To Find House In Mumbai share her experience
“तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम?”, ‘बिग बॉस १८’मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीला मुंबईत घर शोधताना आला धक्कादायक अनुभव, म्हणाली…
Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra share emotional birthday wish to sushant singh rajput
‘बिग बॉस १८’चा विजेता करणवीर मेहराला सुशांत सिंह राजपूतची आली आठवण, भावुक पोस्ट करत म्हणाला…
Shubhangi Gokhale
“आपण कितीही पुढारलेलो असलो, तरी लोकांच्या मनात…”, शुभांगी गोखले एकटं राहण्यावर म्हणाल्या, “मी ५० वर्षांची झाले, त्यानंतर…”
Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab shramesh betkar reels video viral
Video: “चेहरा क्या देखते हो…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब-श्रमेश बेटकरचा ‘हा’ Reel व्हिडीओ पाहिलात का? एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष
mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul has these expectations from her brother
“मी त्याला ऑलिम्पिक स्पर्धेत पाठवणार अन्…”, मायरा वायकुळला भावाकडून आहेत ‘या’ अपेक्षा, म्हणाली…

स्पृहा जोशी, रुमानी खरे, रेश्मा शिंदे, अनघा अतुल, आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे दिग्दर्शक, शुभांगी गोखले, श्रीकांत यादव, सुमीत पुसावळे व त्याची पत्नी असे सगळे सेलिब्रिटी या जोडप्याच्या लग्नाला उपस्थित होते. ‘रंग माझा वेगळा’च्या टीमने नवरा-नवरीसह यावेळी छानसा सेल्फी सुद्धा काढला. यापूर्वी या सगळ्यांनी मिळून अंबर-शिवानीचं थाटामाटात केळवण केलं होतं. आता ही सगळी टीम या जोडप्याच्या लग्नाला सुद्धा उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळत आहे.

rang maza vegala team attends shivani sonar and ambar ganpule wedding
शिवानी-अंबरच्या लग्नाला पोहोचली ‘रंग माझा वेगळा’ मालिकेची टीम ( Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding )

शिवानी सोनार व अंबर गणपुळे यांनी सप्तपदी घेताना पारंपरिक लूक केला होता. तर लग्न लागताना ही जोडी इंडो-वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे. या दोघांनी आपल्या नावांची फोड करुन अलीकडच्या ट्रेंडनुसार लग्नसोहळ्यात खास ‘#AmbAni Wedding’ हा हॅशटॅग वापरला होता.

Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding
अंबर-शिवानीसाठी हर्षदा खानविलकर यांची खास पोस्ट ( Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding )

सध्या कलाविश्वातून शिवानी आणि अंबरवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अंबरने आतापर्यंत ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla ) आणि ‘कलर्स मराठी’ची मालिका ‘दुर्वा’ यामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर, शिवानी ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ अशा मालिकांमध्ये मध्यवर्ती भूमिकेत झळकली आहे.

Story img Loader