कलाकार मंडळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे ते चर्चेत असतात. अनेकदा कलाकारांना सोशल मीडियावरील पोस्टमुळे ट्रोल केलं जातं. त्यामुळे काही कलाकार ट्रोलर्संना सडेतोड उत्तर देतात, तर काही कलाकार ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो चांगलाच व्हायरल होतं आहे.

ही अभिनेत्री सध्या मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय खलनायिका म्हणून ओळखली जाते. तिने आतापर्यंत मालिकांमध्ये केलेली खलनायिका ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतील उतरली आहे. ‘सुखाच्या सारिणी हे मन बावरे’ मालिकेत सावनी, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील आयेशा आणि ‘३६ गुणी जोडी’ मालिकेतील सारिका या सर्व खलनायिकेच्या भूमिका तिने उत्तमरित्या साकारल्या आहेत. यावरून आता लक्षात आलं असेल की, हा बालपणीचा फोटो कोणत्या अभिनेत्रीचा आहे.

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Namrata sambherao
“खूपच अभिमान वाटतो”, अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ सहकलाकाराचे केले कौतुक
Marathi actress Rupal Nand will appear in Tu Hi Re Maza Mitwa
ती पुन्हा येतेय! अभिजीत आमकर-शर्वरी जोगच्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेत ‘स्टार प्रवाह’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार
Ashwini Mahangade
“तरीही हिमतीने रणांगणावर…”, अभिनेत्री अश्विनी महांगडे फोटो शेअर करीत काय म्हणाली?
marathi actress pratima deshpande baby name
वर्षभरापूर्वी लग्नगाठ बांधणारी मराठी अभिनेत्री झाली आई, लेकीचं नाव ठेवलं ‘अहना’; नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ चर्चेत
bigg boss marathi fame actress dances on pushpa 2 peelings song
“फ्लावर समझा क्या…”, म्हणत मराठी अभिनेत्रींचा ‘पुष्पा २’च्या गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “सोना-मोना…”

हेही वाचा – सुकन्या मोनेंनी सांगितले लग्नानंतर संजय यांच्यात झालेले बदल; म्हणाल्या, “खूप…”

चष्मा घातलेली आणि निरासग चेहरा असलेली ही अभिनेत्री म्हणजे विदिशा म्हसकर. विदिशाने हा बालपणीचा फोटो नुकताच शेअर केला आहे. ‘हरवली आहे’ असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदेने प्रतिक्रिया देत लिहीलं आहे की, अगं ती मला सापडली आहे. आता मी माझ्याकडेच ठेवणार आहे. यावर विदिशाने म्हणाली, “हाहाहा…तुझ्या घरात जागा देशील का गं?”

हेही वाचा – प्रकाश राज यांनी कंगना रणौतची उडवली खिल्ली; अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ रिट्वीट करत म्हणाले…

हेही वाचा – “आजकाल कोकणी संस्कृती दाखवण्यापेक्षा माज अन्…”, ‘कोकण हार्टेड गर्ल’वर ‘त्या’ व्हिडीओमुळे टीकेचा भडीमार

तसेच विदिशाच्या या फोटोवर एका चाहत्याने लिहीलं आहे, ‘नियतीचा खेळ – निरागस मुलगी झाली खलनायिका’ तर दुसऱ्या चाहत्याने लिहीलं आहे, ‘ही हरवली आहे आणि आता मोठी स्टार झाली आहे.’ तसेच तिसऱ्या चाहत्यानं विचारलं, ‘किती जणांनी त्यावेळी डबल बॅटरी म्हटलं खरं खरं सांग?’

Story img Loader