‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. दीपा, श्वेता, सौंदर्या, कार्तिकची भूमिका साकारणारे कलाकार घराघरांत प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले. आता मालिका संपल्यावर यामधील बहुतांश कलाकार नव्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमांतून प्रेक्षकांसमोर येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत श्वेताच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अनघा अतुल एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अनघा अतुल ही पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक आहे. काही दिवसांपूर्वी अनघा तिच्या नव्या हॉटेलमुळे चर्चेत होती. आता सध्या तिच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाच्या चर्चा सुरू आहेत. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर अवघ्या ३ महिन्यांत अनघा एका नव्या भूमिकेत झळकली आहे.

हेही वाचा : ‘अप्पी आमची कलेक्टर’ आता नवीन वेळेत! ‘झी मराठी’वर होणार मोठा बदल, ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार निरोप

‘कलर्स मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’मध्ये अनघा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याची पहिली झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘पिरतीचा वनवा…’मधील प्रमुख नायक अर्जुन जेवायला एका उपाहारगृहात जातो. यावेळी तो दुपारच्या जेवणात काय आहे? याबाबत चौकशी करतो परंतु, हॉटेल चालवणारी मालकीण सर्व संपल्याचं त्याला सांगते. या हॉटेलच्या मालकीण बाईंच्या रुपात अनघा प्रेक्षकांसमोर आली आहे. तसेच प्रोमो पाहून अर्जुन व तिचा आधीपासून परिचय असल्याचं लक्षात येत आहे.

हेही वाचा : “दोघांच्या लग्नाला आमचा पाठिंबा नव्हता”, अंकिता लोखंडेच्या सासूबाईंनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाल्या, “त्यांच्यातील भांडणं…”

एकीकडे अर्जुनच्या समोर त्याची जुनी मैत्रीण आलेली असताना दुसरीकडे साविची आई तिला लग्न करण्याबद्दल विचारते. आता अनघा अतुलच्या मालिकेतील एन्ट्रीमुळे याचा अर्जुन-साविच्या नात्यावर कसा परिणाम होणार, मालिकेत आणखी कोणते ट्विस्ट येणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rang maza vegla fame actress aka bhagare guruji daughter anagha atul entry in colors marathi serial sva 00