‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलने नुकतंच पुण्यात नवीन हॉटेल सुरू केलं आहे. पुण्यातील डेक्कन परिसरात अभिनेत्रीने ‘वदनी कवळ’ नावाच्या शुद्धा शाकाहारी हॉटेलचा शुभारंभ केला आहे. १९ ऑक्टोबरला या नव्या हॉटेलचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला आणि लाडक्या मैत्रिणीली शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री ऋतुजा बागवे पोहोचली होती. ऋतुजाने या हॉटेलची खास झलक तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हेही वाचा : India vs Bangladesh : विराट कोहलीने झळकावले यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिलं शतक, पत्नी अनुष्का शर्मा म्हणाली…
ऋतुजा बागवे आणि अनघा अतुल अनेक वर्षांपासून चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे अनघाच्या नव्या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी खास ऋतुजाने हजेरी लावली होती. नव्या हॉटेलमध्ये पाहुणी म्हणून आलेल्या ऋतुजाला अनघाने स्वत:च्या हाताने जेवण वाढलं.
हेही वाचा : “…ते माझे पहिले प्रेम होते”, अक्षय कुमारने केला खुलासा, म्हणाला “मी २३ वर्षांचा…”
अनघा अतुलने सुरू केलेल्या ‘वदनी कवळ’ हॉटेलमध्ये येणाऱ्या खवय्यांना शुद्धा शाकाहारी पारंपरिक थाळीचा आस्वाद घेता येणार आहे. ऋतुजाने या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या थाळीचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अनघा तिला सीताफळ रबडी वाढताना दिसत आहे. अनघाने तिचा भाऊ अखिलेश भगरेच्या साथीने या नव्या व्यवसायाची सुरूवात केली आहे.
हेही वाचा : खऱ्या आईला भेटायला गेलेला चैतू, गावकऱ्यांचं प्रेम अन्…; नागराज मंजुळेंच्या ‘नाळ २’ मधील पहिलं गाणं प्रदर्शित
अभिनेत्रीला शुभेच्छा देताना ऋतुजा लिहिते, “मला तुझा प्रचंड अभिमान वाटते…पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा! खूप प्रेम…लव्ह यू खूप अन्नदाता सुखी भव:” दरम्यान, मराठी कलाविश्वातील कलाकारमंडळींसह नेटकऱ्यांनी अनघावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.