‘स्टार प्रवाह’वरील ‘रंग माझा वेगळा’ मालिका चांगलीच गाजली. त्यामुळे मालिकेतील कलाकार मंडळी आजही चर्चेत असतात. या मालिकेतील आता एक अभिनेत्री लवकरच चित्रपटात झळकणार आहे. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.
‘रंग माझा वेगळा’मधील ही अभिनेत्री गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. चर्चेच कारण म्हणजे तिने अभिनया व्यतिरिक्त दुसऱ्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तिने स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे. आता ‘रंग माझा वेगळा’मधील ही अभिनेत्री कोणं हे ओळखचं आहे. हा, अनघा अतुल.
हेही वाचा – Video: ‘रात्रीस खेळ चाले’मधल्या माईची ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, झळकणार ‘या’ भूमिकेत
भगरे गुरुचींची कन्या आणि ‘रंग माझा वेगळा’मधील श्वेता अर्थात अनघा लवकरच चित्रपटात झळकणार आहे. यासंदर्भात तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये चित्रपटाची स्क्रिप्ट आणि लोकेशन दिसत आहे. तसेच या फोटोवर अनघाने लिहिलं आहे, “मुव्ही टाइम…लवकरच…गणपती बाप्पा मोरया.” पण अनघाने अद्याप ती कोणत्या चित्रपटात झळकणार, याची माहिती दिली नाहीये.
हेही वाचा – रणबीर कपूर-कतरिना कैफच्या ब्रेकअपवर आलिया भट्टनं सोडलं मौन, म्हणाली, “मी अनेक ठिकाणी…”
दरम्यान, अनघाने १९ ऑक्टोबरला स्वतःचं पुण्यातील डेक्कन परिसरात हॉटेल सुरू केलं आहे. ‘वदनी कवळ’ असं या हॉटेलचं नावं असून ती नेहमी सोशल मीडियावर याचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अनेक कलाकार मंडळींनी तिच्या या हॉटेलमधील जेवणाचा आस्वाद घेतला आहे.