Rang Maza Vegla Actress New Business : अलीकडच्या काळात अनेक मराठी कलाकारांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. मृणाल दुसानिस, अपूर्वा गोरे, अक्षया देवधर, अनघा अतुल या अभिनेत्रींपाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने याच मालिकेत झळकलेल्या एका अभिनेत्याबरोबर नवीन व्यवसाय सुरू केला आहे.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने कार्तिक-दीपाची लेक कार्तिकी इनामदारची भूमिका साकारली होती. तर, अभिनेता मेघन जाधव सुद्धा या मालिकेत झळकला होता. अनुष्का आणि मेघन या दोघांनी मिळून नवीन स्टार्टअप सुरू केला आहे.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…

हेही वाचा : Pushpa 2 : “श्रीवल्ली मेरी बायको…”, जबरदस्त डायलॉग अन् अल्लू अर्जुनचा हटके अंदाज; ‘पुष्पा २’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

अनुष्का आणि मेघन यांच्या नव्या व्यवसायाचं नाव आहे ‘Marry & Adore’ असं आहे. ‘Marry & Adore’ या नावाने या दोघांनी फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला आहे. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत या दोघांनी याबद्दल माहिती दिली आहे.

अनुष्का आणि मेघन ( Rang Maza Vegla ) पोस्ट शेअर करत लिहितात, “लग्नातील खास क्षण कॅप्चर करणं किती महत्त्वाचं असू शकतं हे आम्हाला माहिती आहे आणि म्हणूनच तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुमच्या लग्नाचा दिवस खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरावा यासाठी आमच्याकडे छायाचित्रकारांची प्रतिभावान टीम आहे. आताच चौकशी करा”

हेही वाचा : ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”

हेही वाचा : खूप बोअर करताय, ठरवून ताणलेली मालिका अन्…; ‘ठरलं तर मग’चा नवीन ट्रॅक पाहून प्रेक्षक नाराज! पुढे काय घडणार?

Rang Maza Vegla
अनुष्का व मेघन ( Rang Maza Vegla )

अनुष्का आणि मेघन यांनी नव्या व्यवसायाची घोषणा करताच नेटकऱ्यांसह त्यांच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, मेघन हा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेता मंदार जाधवचा धाकटा भाऊ आहे. मंदार आणि मेघन या दोन्ही भावांनी मिळून मराठीसह हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर, अनुष्का पिंपुटकर नुकतीच ‘पाणीपुरी’ चित्रपटात झळकली आहे.

Story img Loader