‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ बंद झाल्यानंतर आता ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेले चार वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून अलीकडेच मालिकेने १००० भागांचा टप्पा पार केला होता. आता मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकार मंडळींच्या भावुक पोस्ट पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा – “किती काळ काठावर उभं राहून…” बिग बॉस फेम अभिनेत्यानं भाजपमध्ये केला जाहीर प्रवेश; म्हणाला…
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील दीपा ही भूमिका विशेष गाजली. सुरुवातीला वर्णावरून खूप ट्रोल करण्यात आलं होतं. पण प्रेक्षकांनी या मालिकेला केव्हा आपलंस करून घेतलं हे कळालंच नाही. टीआरपीच्या यादीत ही मालिका अव्वल स्थानावर होती. पण आता मालिकेचा शेवट आल्यामुळे टीआरपीमध्ये घसरण होताना पाहायला मिळतं आहे.
हेही वाचा – Video: “समोरचा मेला तरी कोणी…”, शरद पोंक्षेंचं वक्तव्य चर्चेत; चाळ संस्कृतीविषयी केलं भाष्य
लवकरच ‘रंग माझा वेगळा’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचनिमित्तानं दीपा म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदेनं ‘मज्जा’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधला. त्यावेळी ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तिला विचारलं गेलं की, ‘सेटवरची एक अशी गोष्ट जी तुझ्या कायम लक्षात राहील, ती कोणती?”
यावर रेश्मा म्हणाली की, “लँच टाइम. हा मला कायम लक्षात राहील आहे. जेव्हा सेटवर लँच टाइम होतो तेव्हा आम्हाला खूप मज्जा येते. असा कुठलाच दिवस नाही की, आम्ही लँच टाइम कोणी नसतो. कोणी कोणाशी भांडू दे, चिडू दे, रुसवे फुगवे असू दे किंवा कोणाच्या तरी वैयक्तिक जीवनात काही घडलं जरी असेल तरी कधी कोणीच लँच टाइम मीस केला नाही. आमच्या तिथे खूप गप्पा होतात. म्हणून आम्ही सरांना सांगतही असतो की, वेळेत ब्रेक करा वगैरे. त्यामुळे मालिका संपल्यानंतर हा गोष्टीची मला खूप आठवण येईल.”