गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. अभिनय क्षेत्रातील काम सांभाळत स्वतः व्यवसायही करताना दिसत आहेत. अलीकडेच ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री श्रेया बुगडेने स्वतःचं नवं रेस्टॉरंट सुरू केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द बिग फिश अँड कंपनी’ असं श्रेयाच्या नव्या रेस्टॉरंटचं नाव आहे. अभिनेत्रीने दादरमध्ये हे नवं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी श्रेयाच्या नव्या रेस्टॉरंटचा शुभारंभ झाला. अभिनेत्री हर्षदा खानविलकर, संजय जाधव, सुकन्या मोने, संजय मोने यांनी शुभारंभाला हजेरी लावली होती. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकतंच या रेस्टॉरंटला ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेने भेट दिली.

हेही वाचा – Bigg Boss 17: ९ वर्षांची असताना आयशा खानचा झाला होता विनयभंग, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली…

रेश्मा व श्रेया खूप चांगल्या मैत्री आहेत. रेश्माने श्रेयाच्या नव्या रेस्टॉरंट बाहेरचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत लिहिलं, “श्रेया तुला नव्या साहसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा…बऱ्याच दिवसांनंतर खूप छान, स्वादिष्ट जेवण जेवले. त्यामुळे माझं पोट खूप भरलं. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम…”

हेही वाचा – Video: संकर्षण कऱ्हाडेने शरद पोंक्षेंच्या ‘त्या’ धाडसी निर्णयाचं केलं कौतुक, म्हणाला…

दरम्यान, श्रेया बुगडेपूर्वी ‘रंग माझा वेगळा’ फेम अनघा अतुलने पुण्यात स्वतःचं हॉटेल सुरू केलं. ‘वदनी कवळ’ असं तिच्या हॉटेलचं नाव आहे. याशिवाय सुप्रिया पाठारे, नम्रता प्रधान, निरंजन कुलकर्णी यांनी देखील व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. कोणी हॉटेल सुरू केलं आहे, तर कोणी कॅफे सुरू केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rang maza vegla fame actress reshma shinde visits shreya bugde new restaurant pps