तुळशीच्या विवाहनंतर लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. बरेच कलाकार येत्या काळात बोहल्यावर चढणार आहेत. त्यामुळे कलाकारांचं केळवण, बॅचलर पार्टी सुरू आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गाजलेली मालिका ‘रंग माझा वेगळा’मधील दोन कलाकार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. एक म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि दुसरा अभिनेता अंबर गणपुळे. काही दिवसांपूर्वी रेश्मा शिंदेचं ‘रंग माझा वेगळा’च्या टीमने पारंपरिक पद्धतीने केळवण केलं होतं. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होतं आहे. त्यानंतर आता अंबर गणपुळेच्या बॅचलर पार्टीचे फोटो समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता अंबर गणपुळे ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सिंधुताई माझी माई’ फेम शिवानी सोनारशी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ९ एप्रिलला दोघांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्यानंतर सहा महिन्यांनी अंबर आणि शिवानी बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकतीच दोघांची बॅचलर पार्टी झाली. याचे फोटो शिवानीने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा – व्याहीभोजन! ‘शिवा’चा आशू खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार; होणारी पत्नी काय काम करते? जाणून घ्या…

I wish some nights lasted forever, असं कॅप्शन लिहित शिवानी सोनारने बॅचलर पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. लग्नाआधी मित्र-मैत्रिणीबरोबर अंबर आणि शिवानीने बॅचलर पार्टी केली. यावेळी अंबरने निळ्या रंगाच्या शेडमधील शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. तर शिवानीने पांढऱ्या रंगाचा आउटफिट घातला होता. तर दोघांच्या मित्र-मैत्रिणींनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. मोठ्या थाटामाटात दोघांची बॅचलर पार्टी झाली. अंबर आणि शिवानीच्या या बॅचलर पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेतील संजू अडकला लग्नबंधनात, किंशुक वैद्यचं मराठी रितीरिवाजानुसार झालं लग्न; फोटो आले समोर

अंबर आणि शिवानीची लव्हस्टोरी

काही महिन्यांपूर्वी शिवानीने लव्हस्टोरी सांगितली होती. ती म्हणाली होती, “आम्ही दोघं एकमेकांना भेटणं हे अनपेक्षित होतं. कारण आम्ही दोन्ही टोकाची दोन माणसं आहोत. मी खूप वेगळी आहे आणि तो खूप वेगळा आहे. तो त्याचा शो संपवून पुण्यात आला होता. तो पुण्याचाच आहे. तर त्यावेळेस मी माझा शो संपवून पुण्यात आले होते आणि आम्ही एकमेकांना ओळखत होतो. कारण कधी नाटकाच्या प्रयोगाला भेटलो होतो तर कधी कोणाच्या लग्नात भेटलो होतो. एवढीच ओळख होती. काही मैत्री वगैरे नव्हती. त्या १५ दिवसांत असं झालं की, आमचा एक कॉमन मित्र आहे. जो माझा चांगला मित्र आहे पराग. त्याला एक शॉर्ट फिल्म करायची होती. त्याच्या खूप दिवसांपासून डोक्यात होतं की, आम्हा दोघांना कपल म्हणून कास्ट करायचं.

हेही वाचा – “अथक मेहनत करून…”, सहा महिन्यांत बंद होणाऱ्या ‘अबीर गुलाल’ मालिकेतील अभिनेत्रीचं पत्र; म्हणाली, “हाय अंबाबाईची साथ, तर…”

“आम्ही त्याच्यासाठी भेटलो. त्याचं वाचन, रिहर्सल या सगळ्यासाठी भेटलो. पण काही कारणास्तव ती शॉर्ट फिल्म पूर्ण झाली नाही. पण आमची फिल्म वर्क झाली. नंतर मग पुढे सगळंच झालं. त्याने मला विचारलं, काय तुझे विचार आहेत नक्की. काय झोन आहे आणि मग सगळं झालं”, असं शिवानीने म्हणाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rang maza vegla fame ambar ganpule and shivani sonar bachelor party photos viral pps