‘रंग माझा वेगळा’ ही मालिका बंद होऊन वर्ष उलटलं आहे. तरीही या मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील या गाजलेल्या मालिकेतील कलाकार आता नवनवीन भूमिकेत पाहायला मिळत आहेत. कोणी नाटक, तर कोणी मालिका, चित्रपटात काम करत आहेत. अशातच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री आपल्या आजीबरोबर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत झळकलेली ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून अनघा अतुल आहे. नोव्हेंबर महिन्यात अनघाचा भाऊ अखिलेश भगरेचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. ग्रहयज्ञ, मेहंदी, हळद, साखरपुडा, रेसिप्शन, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा अखिलेश भगरेचा पाहायला मिळाला. या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. नुकताच अनघाने भावाच्या लग्नातील आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Tanvi Malhara married to Pratham Mehta
२८ वर्षीय अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, ‘या’ मालिकेत साकारलेली मुख्य भूमिका; शाही सोहळ्याचे फोटो चर्चेत
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
shashank ketkar will become father for second time
शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा होणार! नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिली गुडन्यूज, पत्नी व मुलासह केलं खास फोटोशूट
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
aai kuthe kay karte fame abhishek Deshmukh dance with wife krutika deo and sumant thakare in kaumudi walokar sangeet ceremony
Video: झूम बराबर झूम…; कौमुदीच्या संगीत सोहळ्यात ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखचा पत्नीसह जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Groom funny dance at baarat video went viral on social medi
मुलांनो असा डान्स येत असेल तरच लग्न करा! वरातीत नवरदेवाने धरला ठेका, VIDEO पाहून पोट धरून हसाल
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Bigg Boss Marathi season 5 Jahnavi Killekar entry in aboli star pravah serial
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकर लवकरच नव्या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार, ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत झळकणार

हेही वाचा – सूरज चव्हाण वाढदिवसाला न आल्यामुळे घनःश्याम दरवडे झाला भावुक, म्हणाला, “आम्हाला बॅनर लावायचे होते तेव्हा…”

अनघा अतुलने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती आजीबरोबर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. दोघी लोकप्रिय गाणं ‘झिंगाट’वर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. अनघा आणि तिच्या आजीचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

दरम्यान, अनघा अतुलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेनंतर ती ‘कलर्स मराठी’वरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळाली. तिने या मालिकेत मनालीची भूमिका साकारली होती. सध्या अनघाचं ‘शिकायला गेलो एक’ हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. ‘शिकायला गेलो एक’ या नाटकात अनघासह अभिनेत्री प्रशांत दामले, हृषिकेश शेलार, सुशील इनामदार प्रमुख भूमिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18: १२व्या आठवड्यात हृतिक रोशनची लाइफ कोच झाली एविक्ट; म्हणाली, “कशिशमुळे मी आज बाहेर…”

तसंच अनघा लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. तिच्या चित्रपटाचं नाव ‘छबी’ असं आहे. काही दिवसांपूर्वी ‘छबी’ चित्रपटाच्या क्लॅपचा व्हिडीओ अनघाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अनघा अतुलने लिहिलं होतं की, नवीन चित्रपट, नवीन भूमिका…आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. ‘छबी’ चित्रपटात अनघा कोणत्या भूमिकेत झळकणार आणि चित्रपट कधी प्रदर्शित होणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Story img Loader