‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील श्वेता या खलनायिकेच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अनघा अतुल घराघरांत लोकप्रिय झाली. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका संपल्यावर अनघाने प्रेक्षकांना नवा व्यवसाय सुरू करत आनंदाची बातमी दिली. अभिनेत्रीने तिच्या भावाच्या साथीने ‘वदनी कवळ’ हे शुद्धा शाकाहारी हॉटेल पुण्यात सुरू केलं आहे. हा नवा व्यवसाय का सुरू केला? हॉटेलचं नाव कसं सुचलं? याविषयी अनघाने नुकत्याच एका व्हिडीओमध्ये खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : “माझी ॲक्टिंग बघा…”, नम्रता संभेरावने शेअर केला लेकाचा मजेशीर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “रुद्राज खूप…”

अनघाने नुकतीच मराठी मनोरंजन वाहिनीला मुलाखत दिली यावेळी ती म्हणाली, “माझा भाऊ आधीपासून हॉटेल व्यवसायासाठी सगळं नियोजन करत होता. त्यामुळे मी त्याला मदत करायची असं ठरवलं. आमच्या हॉटेलचं ‘वदनी कवळ’ हे नाव माझ्या बाबांनी (पंडीत अतुलशास्त्री भगरे) सुचवलं. यामागे खूपच खास कारण आहे.”

अनघा पुढे म्हणाली, “जेवताना ‘वदनी कवळ’ श्लोक बोलून आपण देवाचं नामस्मरण करतो. आपल्याला चांगला आहार मिळतोय यासाठी आपण देवाचे आभार मानले पाहिजेत अशी यामागची भावना होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन थाळी मिळते. त्यामुळे त्या थाळीला हे ‘वदनी कवळ’ नाव अगदी साजेसं आहे.”

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रेया बुगडेला पाठवली दिवाळी भेट, फोटो पोस्ट करत म्हणाली…

पुणेकरांना थाळी हा प्रकार खूप आवडतो असं मला थोडाफार रिसर्च करून समजलं. मोदक, वरण-भात, भाजी-पोळी असं सगळं जेवण जेवल्यावर माणूस अगदी तृप्त होतो. त्यामुळे मी थाळी सुरू करण्याचा निर्णय घेतला. असं अनघा अतुलने सांगितलं. दरम्यान, अनघा अतुल ही पंडीत अतुलशास्त्री भगरे यांची कन्या आहे. आपल्या दोन्ही मुलांना नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते पहिल्या दिवशी या ‘वदनी कवळ’च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rang maza vegla fame anagha atul reveals her father bhagare guruji decided her new hotel name sva 00