‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘रंग माझा वेगळा’. या लोकप्रिय मालिकेने चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने प्रेक्षकांना निरोप घेतला. पण मालिकेतील कलाकार अजूनही चर्चेत आहेत. हे कलाकार आता वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळत आहे. लवकरच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील अभिनेत्री एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. यासंदर्भात तिने नुकतीच स्वतः पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले. या कलाकारांनी साकारलेली पात्र चांगलीच गाजली. तसंच इतर कलाकारांनी देखील निभावलेली पात्र घराघरात पोहोचली. त्यापैकी एक म्हणजे श्वेता. अभिनेत्री अनघा अतुलने हे पात्र उत्तमरित्या साकारलं. त्यामुळे अजूनही तिला श्वेता म्हणून अधिक ओळखतात. आता हीच श्वेता म्हणजेच अनघा नव्या रुपात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Video: ‘फुलवंती’ आणि ‘चंद्रा’ आमनेसामने; ‘मदनमंजिरी’ गाण्यावर प्राजक्ता माळी-अमृता खानविलकरचा जबरदस्त डान्स

अभिनेत्री अनघा अतुल ‘रंग माझा वेगळा’ मालिकेनंतर ‘कलर्स मराठी’वरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळाली. तिने या मालिकेत मनालीची भूमिका साकारली होती. आता लवकरच अनघा नव्या चित्रपटात झळकणार आहे. यासंदर्भात तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

अनघाच्या नव्या चित्रपटाचं नाव ‘छबी’ असं आहे. या ‘छबी’ चित्रपटाच्या क्लॅपचा व्हिडीओ अनघाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अनघा अतुलने लिहिलं आहे की, नवीन चित्रपट, नवीन भूमिका…आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. ‘छबी’ चित्रपटात अनघा कोणत्या भूमिकेत झळकणार आणि चित्रपट कधी प्रदर्शित होणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा – Video: सई ताम्हणकरने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ तिघांचं केलं कौतुक; एकाला म्हणाली, ‘सुपीक जमीन’, तर दुसऱ्याला…

Anangha Atul Instagram Story

हेही वाचा – Video: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा खोट्या! लेकीच्या १३व्या बर्थडेची पार्टी केली होती एकत्र, व्हिडीओ आले समोर

दरम्यान, अनघा अतुलच्या नव्या चित्रपटासह नवं नाटक देखील प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येत आहे. १३ डिसेंबरपासून ‘शिकायला गेलो एक’ हे अनघाचं नाटक रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. ‘शिकायला गेलो एक’ या नाटकात अनघासह अभिनेत्री प्रशांत दामले, हृषिकेश शेलार, सुशील इनामदार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. अलीकडेच अनघाचा भाऊ अखिलेश भगरेचा विवाहसोहळा पार पडला. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अजूनही चर्चेत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rang maza vegla fame anagha atul will appear in the new film pps