आनंद, ऊर्जा, स्फूर्ती देणाऱ्या दिवाळी सणाला आजपासून प्रारंभ झाला आहे. दिवाळीचा आज पहिला दिवस. या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी. या दिवशी गाय वासरांसाठी दिवाळीची पहिली पणती लावली जाते. वसुबारस या सणापासून दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळी म्हटलं की, आकर्षक दिवे, आकाशकंदील, रांगोळी, फराळ असं सर्व काही आलंच. त्यामुळे दिवाळीची तयारी लोक ही आठवड्याभर अगोदर सुरू करतात. या सर्वात अवघड काम असतं फराळ करणं. फराळाच्या ताटा शिवाय दिवाळी ही अपूर्णच असते. त्यामुळे फराळ हा दिवाळीत अत्यंत महत्त्वाची गोष्टी आहे. या फराळामध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चकली. कुरकुरीत, तिखट चकली ही प्रत्येकाला खायला खूप आवडते. याच चकल्या बनवतानाचा एका लहानग्या बालकलाकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “माझं छोटं बाळ आज २१ वर्षांचं झालं”, मलायका अरोराची लेकासाठी खास पोस्ट, म्हणाली, “प्रामाणिक…”

काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेली मालिका ‘रंग माझा वेगळा’मधील ही बालकलाकार आहे. जिने मालिकेत कार्तिकी ही भूमिका साकारली होती. कार्तिकी म्हणजेच बालकलाकार मैत्रेयी दाते हिने तिच्या इन्स्टाग्रामवर चकल्या बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “झाला का फराळ बनवून? माझी सर्वात आवडती चकली,” असं कॅप्शन लिहीत तिने चकल्या बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मैत्रेयी गोल अशा चकल्या गाळताना दिसत आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17: दिवाळीच्या मुहूर्तावर बिग बॉस घरात होणार मोठा धमाका; ‘या’ स्पर्धकाच्या पार्टनरची होणार वाइल्ड कार्ड एंट्री?

हेही वाचा – रांगोळीत रंग भरून, केक कापून अन्…., ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकारांनी ‘असा’ केला साजरा शूटिंगचा शेवटचा दिवस

दरम्यान, मैत्रेयी पूर्वी कार्तिकीची भूमिका बालकलाकार साईशा भोईरने साकारली होती. पण यावर्षी जून महिन्यात साईशाने ‘रंग माझा वेगळा’ मालिका सोडली आणि तिच्या जागी मैत्रेयी झळकली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rang maza vegla fame child artist maitreyee datye make chakli video goes viral pps
Show comments