दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन (Friendship Day) साजरा केला जातो. रक्ताचं नातं नसलं तरी मैत्री हे नातं खूप सुंदर असतं. याचं नात्याचा आज खास दिवस जगभरात साजरा केला जात आहे. यानिमित्तानं कलाकार मंडळीही त्यांच्या खास जीवलग मित्र-मैत्रिणीविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. तसेच त्यांच्या मैत्री विषयी गमतीशीर किस्से सांगत आहे.

नुकताच ‘स्टार प्रवाह’ या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘रंग माझा वेगळा’ फेम दिपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि ‘स्वाभिमान’ फेम पल्लवी म्हणजे पूजा बिरारी या दोघी आपल्या मैत्रीविषयी सांगताना दिसत आहेत. यावेळी रेश्मा व पूजाला विचारलं जात की, ‘तुमची कोणत्या विषयावर भांडणं होतात?’ यावर पूजा म्हणते की, “आम्ही नेहमी त्या एका गोष्टीवरूनच भांडत असू ती म्हणजे वेळ. तिचं (रेश्मा) म्हणणं असतं, तू मला वेळच देत नाही. तू मला भेटतंच नाही आणि मी तशीच आहे.”

Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”
Navri Mile Hitlarla
Video: आजी बेशुद्ध पडणार; एजे लीलावर चिडणार? प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “एकदाच तिला घराबाहेर…”
Shocking video
“आ बैल मुझे मार..” बैलाच्या नादाला लागणं काकाला पडलं महागात, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”

हेही वाचा – मिरा जगन्नाथनं सोडली ‘ठरलं तर मग’ मालिका; आता साक्षीच्या भूमिकेत दिसली ‘ही’ अभिनेत्री

हे ऐकून पुढे रेश्मा म्हणते, “आठवण येते म्हणून ही सतत मला इन्स्टाग्रामवर मीम्स पाठवत असते. आठवणीत मीम्स पाठवणं एवढंच नसतं. तू कशी आहेस? तुझा मूड कसा आहे? सगळं काही ठिक आहे का? असं विचारण खूप महत्त्वाचं आहे. फक्त मैत्रीमध्येच नाही तर प्रत्येक नात्यामध्ये असं विचारणं खूप महत्त्वाचं असतं. मीम्स पाठवले म्हणजे आठवण येते असं नाही. तो टाइम पास असतो.”

हेही वाचा – Bigg Boss OTT 2: मनीषा रानीला टार्गेट केल्यामुळे वडील प्रमोद कुमार यांनी सलमान खानविषयी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

यावर पुन्हा पूजा बोलते की, “माझा स्वभाव तसा आहे. जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी घरात बसते किंवा घरातून फोन वगैरे करून बोलते. पण असं काही नसतं की, तू माझ्या मनात नाही किंवा मी तुझा विचार करत नाही. बऱ्याचदा मी एकटी असते. तेव्हा मला असं वाटतं असतं की, हे आपण रेश्माला सांगू या. हे आपण रेश्माबरोबर करू या. आणि नेहमी मी जेव्हा हिला फोन करते तेव्हा ही ओरडायला सुरुवात करते. आता वेळ मिळाला का? काय काम आहे? आज कशी काय आठवण आली? असं हिचं सुरू असतं. पण माझा नेहमी हिला हा प्रश्न असतो की, तू कशी आहेस ते सांग? शूटमध्ये आहे का? दमली आहेस का? वगैरे.” यानंतर रेश्मा बोलते की, “हे खरं आहे.” असे गमतीशीर किस्से या दोघींनी या व्हिडीओत सांगितले आहेत.

हेही वाचा – ‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’ म्हणतं सोनाली कुलकर्णीनं खास मैत्रिणीबरोबरचा डान्स व्हिडीओ केला शेअर

दरम्यान, रेश्मा व पूजाच्या मैत्रीचं नातं आपण याआधी फोटो व व्हिडीओमधून बऱ्याचदा पाहिलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पूजाची आई रेश्मासाठी खास जेवण बनवताना दिसली होती. त्यासंबंधीचा व्हिडीओ रेश्मानं सोशल मीडियावर शेअर केला होता.

Story img Loader