‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २०१९ साली सुरू झालेल्या या मालिकेने चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दीपा, कार्तिक, सौंदर्या इनामदार, आयेशा, कार्तिकी, दीपिका ही पात्र महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहेत. नवनवीन ट्विस्टमुळे या मालिकेने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीमध्येही मालिका मागे नव्हती. पण आता मालिका शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. लवकरच मालिकेचा गोड शेवट होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – कुणी म्हणाले वेडे, तर कुणी म्हणाले प्रेरणादायी; अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या नव्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या जागी तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. याचनिमित्तानं या मालिकेतील खलनायिका म्हणजे आयेशाचं पात्र साकारणारी अभिनेत्री विदिशा म्हसकरनं ‘मज्जा’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘आयेशा या पात्राकडून तू काय-काय घेशील?’

हेही वाचा – “‘रंग माझा वेगळा’ संपल्यानंतर …” अभिनेत्री रेश्मा शिंदे झाली भावुक, म्हणाली, “‘ही’ गोष्ट कायम…”

यावर विदिशा म्हणाली की, “आयेशाकडून घेण्यासारखं काही नाहीये आणि जर मी घेतलं तर माझ्या आयुष्यातली सगळी माणसं उद्ध्वस्त होतील. आयेशाच वागणं सोडलं तर एखाद्यावर जीवापाड प्रेम करणं हा गुण मी तिच्याकडून घेईन. कारण आयेशा कार्तिकवर जेवढं जीवापाड, झोकून प्रेम करते ना. तेवढं मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात कोणावर नाही करू शकत. मी स्वतःवरच खूप प्रेम करते. त्यामुळे आयेशा एवढं प्रेम मी दुसऱ्यांना नाही देऊ शकत. पण आता एकदा तेही करू बघावं असं मला वाटतंय. कारण त्यामध्ये माणूस किती वेडा होतो? हे कळेल. त्यामुळे ही एकच गोष्ट आयेशाकडून घेऊ शकते.”

हेही वाचा – “किती काळ काठावर उभं राहून…” बिग बॉस फेम अभिनेत्यानं भाजपमध्ये केला जाहीर प्रवेश; म्हणाला…

दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेपूर्वी विदिशाने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतही तिनं खलनायिकेचं पात्र निभावलं होतं. सावनी असं तिच्या पात्राचं नाव होतं, जे चांगलंच गाजलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rang maza vegla fame vidisha mhaskar talk about her ayesha role pps