Rang Maza Vegla Fame Ambar Ganpule Kelvan : ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने जवळपास ४ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला असला तरीही, यामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारे सगळे कलाकार आजही एकमेकांच्या तेवढेच संपर्कात असतात. काही दिवसांपूर्वीच या सगळ्या कलाकारांनी मिळून अभिनेत्री रेश्मा शिंदेचं केळवण केलं होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आता रेश्मानंतर ‘रंग माझा वेगळा’च्या ( Rang Maza Vegla ) टीमने अंबर गणपुळेच्या केळवणासाठी जय्यत तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेच्या टीमने या अंबर-शिवानी जोडप्याचं केळवण एका हॉटेलमध्ये केलं. यासाठी संपूर्ण फुलांची सजावट करण्यात आली होती. याशिवाय केळीच्या पानावर ‘शिवानी-अंबरचं केळवण’ असं लिहिण्यात आलं होतं.
शिवानी आणि अंबरचा साखरपुडा गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पार पडला होता. यानंतर ही जोडी विवाहबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. केळवण पार पडल्यावर आता दोघांच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होऊन लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने अंबर-शिवानीच्या केळवणात धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे. याचे अनेक Inside व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवानी व अंबर यांच्या केळवणाला, रेश्मा शिंदे, विदिषा म्हसकर, शाल्मली टोळ्ये, आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर, तनिषा विषे, पूर्णिमा तळवलकर असे मालिकेतील सगळे कलाकार उपस्थित होते.
याशिवाय ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेता सुमीत पुसावळे व त्याची पत्नी मोनिका यांनी देखील अंबर-शिवानीचं केळवण केल्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच यांच्या लग्नसोहळ्यात दोघांच्या नावाची फोड करुन ‘Ambani’ हा खास हॅशटॅग वापरण्यात येत आहे.
दरम्यान, अंबर-शिवानीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अंबरने आतापर्यंत ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla ), ‘कलर्स मराठी’ची मालिका ‘दुर्वा’ यामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर, शिवानी ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ अशा मालिकांमध्ये झळकली आहे. आता लवकरच शिवानी आणि अंबर यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.