छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग, दिग्दर्शक रोहित शेट्टीसह ‘सर्कस’ चित्रपटाच्या टीमने हास्यजत्रेत हजेरी लावली. हास्यजत्रेतील कलाकरांचे रणवीरबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री शिवाली परबलाही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून प्रसिद्धी मिळाली. शिवालीने ‘सर्कस’ चित्रपटाच्या टीमबरोबरचे हास्यजत्रेच्या सेटवरील काही क्षण व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत. ‘सर्कस’च्या टीमने हास्जत्रेच्या सेटवर धमाल केलेली व्हिडीओत पाहायला मिळत आहे. “होता है होता है, इन सबको मिलके इनसे प्यार हो जाता है” असं कॅप्शन शिवालीने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा>> अक्षय कुमार साकारणार लिओनेल मेस्सीची भूमिका? अभिनेत्याचे अर्जेंटिनाच्या जर्सीतील फोटो व्हायरल

हेही वाचा>>‘बिग बॉस’च्या घरातून अमृता देशमुख बाहेर; विकास सावंत पाठोपाठ ‘पुण्याच्या टॉकरवडी’ची एग्झिट

हास्यचत्रेच्या सेटवर शिवालीने रणवीरबरोबर डान्सही केला. ‘सर्कस’ चित्रपटातील गाण्यावर रणवीर व शिवाली थिरकल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. शिवालीने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> फिफा वर्ल्ड कपवर अर्जेंटिनाने नाव कोरल्यानंतर गौरव मोरेने शेअर केला लिओनेल मेस्सीचा फोटो, म्हणाला…

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा चित्रपट येत्या २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे या कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवही चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh dance with shivali parab on maharashtrachi hasyajatra set video goes viral kak