अभिनेता रणवीर सिंग नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘सर्कस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तो विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. नुकताच तो ‘इंडियन आयडॉल’मध्ये पाहुणा म्हणून सहभागी झाला. यावेळी त्याला एका स्पर्धकाचे गाणं एवढं आवडलं की त्याने त्या स्पर्धकाला एक खास भेट दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणवीर सिंग हा त्याच्या बिनधास्त अॅटीट्यूडमुळे आणि त्याच्या दिलदार स्वभावामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. तो नेहमी स्वतःचं स्टारडम विसरून चाहत्यांमध्ये मिसळताना दिसतो. त्याच्या नम्रपणाचे सर्वजण कौतुक करत असतात. आताही पुन्हा एकदा त्याने असंच काहीसं केलं आहे.

हेही वाचा : हिना खानने मॅनेजरच्या लग्नात केलेल्या ‘या’ कृतीमुळे नवरदेवाला थेट गमवावे लागले १ लाख रुपये

‘सर्कस’ या आगामी चित्रपटाच्या टीमबरोबर रणवीरने ‘इंडियन आयडॉल’मध्ये हजेरी लावली. यावेळी सर्वांनीच स्पर्धकांच्या गाण्यांचा आनंद घेतला. यावेळी ऋषी सिंहने ‘पहला पहला प्यार है’ हे गाणं गायला. ऋषीच्या आवाजाने रणवीर सिंगला वेड लावलं. त्याने ऋषीचं भरभरून कौतुक केलं. तो म्हणाला, “तू पार्श्वगायनासाठी तयार आहेस. तू इथलं संपूर्ण वातावरणच बदलून टाकलंस.” असं म्हणत रणवीर सिंगने ‘आरएस’ लिहिलेला त्याचा ब्रोच काढला आणि तो ऋषीला दिला. रणवीरकडून मिळालेली ही खास भेट पाहून ऋषीही खूप खुश झाला.

हेही वाचा : “त्याने माझ्यामागे कुत्रा…”; रणवीर सिंगने सांगितली प्रसिद्ध निर्मात्याबरोबरची धक्कादायक आठवण

दरम्यान या चित्रपटात रणवीर सिंगसह जॅकलीन फर्नांडिज, पूजा हेगडे, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव, संजय मिश्रा, जॉनी लिवर, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधवसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रणवीर आणि रोहित शेट्टीचा हा ‘सर्कस’ गुलजार यांच्या ‘अंगूर’ चित्रपटावर बेतलेला आहे. या चित्रपटाची प्रेरणा गुलजार यांना शेक्सपिअरच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या कथेवरुन मिळाली होती. २३ डिसेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh gave special gift to indian idol contestant rnv