छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय शो आहे. या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. या शोमध्ये नुकतंच बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने हजेरी लावली होती. आता रणवीर सिंग व रोहित शेट्टी या कार्यक्रमाच्या आगामी भागात दिसणार आहेत.
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ या चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमातील प्रोमो व्हिडीओ कुशल बद्रिकेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कुशल बद्रिके सिंघम स्टाइलमध्ये एन्ट्री घेताना दिसत आहे. त्यानंतर सिंघम स्टाइलनेच अॅक्शन सीन्सही त्याने मंचावर केले आहेत. कुशल बद्रिकेचा विनोदी अभिनय बघून रणवीर सिंग, रोहित शेट्टीसह इतर टीमही खळखळून हसत असल्याचं दिसत आहे.
हेही वाचा>>बॉडी शेमिंगवरुन बोलल्यानंतर अपूर्वा नेमळेकर भडकली, म्हणाली “राखी तुझ्यासारखी प्लास्टिक सर्जरी करुन…”
हेही वाचा>> “तो मर्द आहे…” अर्जुन कपूरवरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावलं
कुशल बद्रिकेच्या अॅक्शननंतर अचानक सरु आजी मंचावर येतात. त्यानंतर त्यांच्या शैलीत पात्रांचा समाचार घेताना दिसत आहेत. सरु आजीचे बोलणे ऐकून रणवीर सिंगला हसू अनावर झाल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. सर्कसची संपूर्ण टीम चला हवा येऊ द्या मध्ये धमाल करताना दिसत आहे.
हेही वाचा>> सलमान खान रिलेशनशिपमध्ये? ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण
रणवीर सिंगचा ‘सर्कस’ हा चित्रपट येत्या २३ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसह दीपिका पदुकोण, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस व मराठमोळा सिद्धार्थ जाधवही झळकला आहे.