स्टंटवर आधारित असलेला ‘खतरों के खिलाडी’चं १४वं पर्व सुरू होण्यापूर्वीची अधिक चर्चेत आलं आहे. प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी हॉस्ट करत असलेल्या या कार्यक्रमाचं सध्या चित्रीकरण सुरू आहे. अजूनपर्यंत टेलिव्हिजनवर ऑनएअर झालेला नाही. पण चित्रीकरणादरम्यान होणाऱ्या गोष्टीचं अपडेट सातत्याने समोर येत आहे. सध्या ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वात सहभागी झालेला असिम रियाज हे नाव खूप चर्चेत आलं आहे. कारणही तसंच आहे. होस्ट रोहित शेट्टीबरोबर पंगा घेतल्यामुळे असिमला ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वातून बाहेर काढल्याचं समोर आलं आहे. पण का? नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

‘खतरों के खिलाडी’च्या यंदाच्या पर्वात असिम रियाजसह कृष्णा श्रॉफ, सुमोना चक्रवर्ती, शालिन भनोट, अभिषेक कुमार, नियाती फटनानी, करण वीर मेहरा, आशीष मल्होत्रा, शिल्पा शिंदे आणि गश्मीर महाजनी पाहायला मिळणार आहेत. पण असिम रियाजला कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं आहे. कारण असिमचे कार्यक्रमातील इतर स्पर्धंकांबरोबर वाद झाले आहेत. हे वाद इतके डोक्याचे झाले की रोहित शेट्टीला असिमला कार्यक्रमाबाहेर काढण्याची वेळ आली.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
Sunil Pal reveals kidnapping details
Comedian Sunil Pal: बेरोजगारांनी केलं कॉमेडियन सुनील पाल यांचं अपहरण; खंडणीच्या पैशांतून सोनं घेतलं, २० हजार देऊन पाल यांना सोडलं
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

हेही वाचा – Video: अरे बापरे! संकर्षण कऱ्हाडे व अमृता खानविलकरचं झालं अपहरण, नेमकं काय घडलंय? जाणून घ्या…

असिम रियाज ‘खतरों के खिलाडी’च्या १४ पर्वासाठी खूप उत्साही होता. पण ‘बिग बॉस’मधील वृत्ती त्याने ‘खतरों के खिलाडी’मध्ये अंगीकारणं खूप महागात पडलं आहे. माहितीनुसार, असिमची शालीन भनोट आणि अभिषेक कुमारबरोबर जोरदार वाद झाले. यावेळी त्याने शिवीगाळ केली; ज्याचा परिमाण त्याला भोगावा लागला. मुळात असिम व शालिनचे वाद सुरू होते. पण शालिन हा अभिषेकचा चांगला मित्र आहे. त्यामुळे अभिषेक या वादात मधे पडला आणि मग हा वाद आणखी पेटला.

हेही वाचा – Video: सासरला ही बहीण निघाली…; शिंदेशाही घराण्यातील लाडक्या लेकीचं झालं मोठ्या थाटामाटात लग्न; उत्कर्ष, आदर्शसह भावंडं झाले भावुक

बॉम्बे टाइम्सच्या वृत्तानुसार, रोहितला असिमचं हे वागणं अजिबात पटलं नाही. तसंच असिमने एका टास्कवरून देखील रोहित शेट्टीशी हुज्जत घातली होती. हा टास्क जीवघेणा असून मी करणार नाही, असा असिम म्हणत होता. पण रोहितने त्याला हा टास्क करायला सांगितला. मात्र असिमने काही ऐकलं नाही. तेव्हा रोहितने त्याला सुनावलं. टास्क तज्ञांच्या देखरेखी खाली केला गेला आहे. तरीही असिम स्वतःचं म्हणण्यावर अडून राहिला. अखेर रोहित शेट्टीने त्याला कार्यक्रमाबाहेर काढलं. याबाबत अजूनपर्यंत निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.

Story img Loader