‘झी मराठी’ वाहिनीवरील नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘पारु’, ‘शिवा’ या दोन नव्या मालिका १२ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसेच ‘जगद्धात्री’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिका देखील लवकरच सुरू होणार आहेत. याच मालिकांपैकी एका मालिकेतून हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय चेहरा अभिनेता राकेश बापट मराठी मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. याचा दमदार प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17 जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीने सर्वात आधी ‘या’ व्यक्तीबरोबर केलं सेलिब्रेशन, व्हिडीओ आला समोर

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो
Akshaya Deodhar and Hardeek Joshi
राणादा अन् पाठकबाई पुन्हा एकत्र झळकणार? अक्षया देवधरच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चा, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो

‘बिग बॉस’मध्ये झळकलेला अभिनेता राकेश बापट आता ‘झी मराठी’च्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार या भूमिकेत राकेश झळकणार आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा पहिला वहिला प्रोमो ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

या प्रोमोमध्ये, नजरेत धार, शिस्तबद्ध आणि रुबाबदार अशा अभिराम जहागीरदारची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळत आहे. यामध्ये आलिशान घर, गाडी असं सर्व काही दिसत आहे. पण आता या हिटलर अभिरामची होणारी नेमकी नवरी कोण असणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

हेही वाचा – होणाऱ्या नवऱ्याच्या आठवणीत पूजा सावंतची खास पोस्ट, सिद्धेश म्हणाला, “तुला भेटण्याची…”

दरम्यान, राकेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘तू आशिकी’, ‘बात हमारी पक्की है’, ‘कुबूल है’, ‘नच बलिए ६’ अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. तसेच ‘वो तुम बिन’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘कुछ दिल ने कहा’, ‘कोई मेरे दिल में है’ यांसारख्या चित्रपटात तो झळकला आहे. शिवाय राकेशने काही मराठी चित्रपटातही काम केलं आहे. आता अभिनेता ‘नवरी मिळे हिटलरला’ या पहिल्या मराठी मालिकेतून मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Story img Loader