‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) मालिकेतील सर्वच कलाकार हे प्रेक्षकांचे लाडके आहेत. या मालिकेतून हे कलाकार हे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतातच. मात्र, त्याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हे कलाकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजे ऊर्फ अभिराम ही भूमिका अभिनेता राकेश बापट(Raqesh Bapat)ने साकारली आहे; तर लीला ही भूमिका वल्लरी विराज(Vallari Viraj)ने साकारली आहे. आता अभिनेता राकेश बापटने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

राकेश बापटने शेअर केला खास व्हिडीओ

राकेश बापटने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो श्वानासह मजा करताना दिसत आहे. राकेश बापटबरोबर दिसणारा हा श्वान केतील महत्त्वाचा भाग आहे. त्याला टायगर, असे म्हटले जाते. टायगर हा जहागीरदार घरातील खास सदस्य आहे. अनेकदा तो मजा-मस्ती करताना मालिकेत पाहायला मिळते. अभिनेता राकेश बापट व टायगरचा हा व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे.

अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करीत अभिनेत्यावरील प्रेम व्यक्त केले आहे. अभिनेत्री मेघना एरंडे यांनीदेखील हार्ट इमोजी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. तर, काही नेटकऱ्यांनी वाह, क्यूट, असे म्हणत कौतुक केले आहे. “एजे मन्याला शोधण्याच्या मिशनवर आहेत”, “वाह, एजे आणि टायगर दोन्ही मस्त”, अशाही कमेंट्स काही नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

राकेश बापटच्या मालिकेतील एजे या भूमिकेला प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळताना दिसते. प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी, असे मानणारा, यशस्वी उद्योजक, कडक शिस्त असलेला; पण तितकाच प्रेमळ, आपल्या माणसांची काळजी घेणारा, आईच्या म्हणण्याचा मान ठेवणारा अशी एजेची भूमिका पाहायला मिळते.

नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दाखविल्याप्रमाणे एजे आता लीलाच्या प्रेमात पडला आहे. याची जाणीव त्याला झाली आहे. मात्र, त्याने त्याच्या भावना लीलासमोर व्यक्त केलेल्या नाहीत. लीलासाठी एजे अनेकविध गोष्टी करताना दिसतो. लीलाची पहिली संक्रांत खास करण्यासाठी एजेने स्वत: हलव्याचे दागिने बनविले असल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. आता तो त्याच्या भावना लीलासमोर कधी व्यक्त करणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader