कलाकार जितके त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. या कलाकारांनी मुलाखतींदरम्यान केलेली वक्तव्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. आता विक्रांत मेस्सीबरोबर नुकतीच द साबरमती रिपोर्ट या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकलेली अभिनेत्री रिद्धी डोगरा(Ridhi Dogra) सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने तिचा पूर्वाश्रमीचा पती राकेश बापट(Raqesh Bapat) याच्याबाबत केलेल्या विधानाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

k

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Navri Mile Hitlerla actress dance on Kishore kumar Eena Meena Deeka song watch video
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांचा किशोर कुमार यांच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
rekha lata mangeshkar
“देवा पुढल्या जन्मी…”, रेखा यांनी सांगितला लता मंगेशकरांबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाल्या, “मला त्यांनी…”
Aishwarya Rai Abhishek Bachchan
“ऐश्वर्या-अभिषेक बच्चनचा स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध…”, ‘कुछ ना कहो’फेम अभिनेत्रीचा खुलासा

अभिनेत्रीने नुकताच ‘पिंकविला’बरोबर संवाद साधला. यावेळी तिचा पूर्वाश्रमीचा पती राकेश बापटबाबत तिने वक्तव्य केले. रिद्धीने म्हटले, “तो माझा एक्स असला तरी तो माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. माझे अनेक जवळचे मित्र-मैत्रिणी असे आहेत, जे अभिनय क्षेत्रात काम करीत नाहीत”, असेही अभिनेत्रीने स्पष्ट केले. तिने एकता कपूर व भाऊ अक्षय डोगरा हे अत्यंत जवळचे असल्याचेही म्हटले आहे.

रिद्धी डोगरा व राकेश बापट हे ‘मर्यादा : लेकिन कब तक?’ या मालिकेच्या सेटवर भेटले होते. त्यानंतर ते प्रेमात पडले. २०११ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. सात वर्षांच्या संसारानंतर या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट झाल्यानंतरही राकेश बापट व रिद्धी डोगरा हे एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे पाहायला मिळते.

रिद्धी डोगरा सध्या तिच्या अभिनय क्षेत्रातील कामामुळे मोठ्या चर्चेत आहे. नुकतीच ती विक्रांत मेस्सी व राशी खन्नाबरोबर ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये दिसली होती. रिद्धीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकांतून केली. ‘राधा कि बेटियाँ कुछ कर दिखायेंगी’, ‘माता-पिता के चरणों में स्वर्ग’, ‘लागी तुझसे लगन’, ‘मर्यादा : लेकिन कब तक?’, ‘वो अपना सा’ आणि अशा अनेक मालिकांमध्ये काम करीत तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली. सध्या रिद्धी ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने ‘असुर’, ‘मॅरिड वूमन’ अशा अनेक वेब सीरिजमध्ये काम केले आहे. २०२३ साली प्रदर्शित झालेल्या शाहरूख खानच्या जवान या चित्रपटातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. तिने ‘टायगर ३’मध्येदेखील काम केले आहे. आगामी काळात रिद्धी ही फवाद खान व वाणी कपूर या कलाकारांबरोबर ‘अबीर गुलाल’मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा: Year Ender 2024 : काहींची आत्महत्या, तर काहींना हृदयविकाराचा झटका; २०२४ मध्ये ‘या’ लोकप्रिय कलाकारांचे झाले निधन

राकेश बापटच्या कामाबद्दल बोलायचे, तर सध्या अभिनेता ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. अभिराम ऊर्फ एजे ही भूमिका त्याने साकारली आहे. अभिनेत्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनांवर राज्य केल्याचे दिसते. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी नवरी मिळे हिटलरला ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

Story img Loader