Rashami Desai Struggle: ‘उतरन’ या टीव्ही मालिकेत तपस्याची भूमिका करून अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai) लोकप्रिय झाली. रश्मीचे खरे नाव शिवानी देसाई आहे. तिने अभिनय क्षेत्रात आल्यावर नाव बदलले. ती आता रश्मी नावाने ओळखली जाते. आसामी चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. नंतर भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं व मग ती हिंदी टीव्ही मालिकांमध्ये आली. इथे तिने खूप यश मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रश्मी करिअरमध्ये यशस्वी झाली, पण वैयक्तिक आयुष्यात तिला खूप चढ-उतारांचा सामना करावा लागला. ३८ वर्षांची रश्मी सिंगल आहे. दोनवेळा ती प्रेमात पडली, पण दोन्हीवेळी पदरी निराशाच राहिली. एकदा लग्न केल्यावर घटस्फोट झाला तर दुसऱ्या नात्यात तिच्या बॉयफ्रेंडने फसवणूक केली. आता रश्मीने तो काळ आठवला जेव्हा तिच्यावर रस्त्यावर राहायची वेळ आली होती.

सेटवर प्रेम, लग्न अन् पाच वर्षांत घटस्फोट! पुन्हा प्रेमात पडल्यावर बॉयफ्रेंडकडून फसवणूक, आता अभिनेत्री…

रश्मी देसाईने नुकतीच अभिनेता पारस छाबराच्या पॉडकास्टला हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या आयुष्यातील कठीण दिवस आठवले. रश्मीला ‘उतरन’ या पहिल्या मालिकेत आयुष्यातील पहिलं प्रेम भेटलं. ती सहकलाकार नंदिश संधूच्या प्रेमात पडली आणि काही काळ डेट केल्यावर दोघांनी २०११ मध्ये लग्न केले, पण अवघ्या पाच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.

हेही वाचा – पूर्वाश्रमीच्या पतीच्या साखरपुड्यानंतर मानसी नाईकची पहिली पोस्ट, शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

तीन कोटींहून जास्त कर्ज

रश्मी देसाईने (Rashami Desai Debt) सांगितलं की नंदिश संधूपासून घटस्फोट घेतल्यावर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. लग्नानंतर काही काळाने नात्यात कुरबुरी होऊ लागल्या. एकीकडे नातं बिघडत होतं तर दुसरीकडे रश्मीवर कोट्यवधी रुपयांचे रुपयांचे कर्ज होते. “माझ्यावर ३.२५ कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यावेळी मी घर घेतलं होतं, त्या घराचेच अडीच कोटी रुपयांचे कर्ज माझ्यावर होते,” असं रश्मी म्हणाली.

अभिनेत्री रश्मी देसाई (फोटो – इन्स्टाग्राम)

“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव

अचानक शो बंद झाला अन्…

रश्मी देसाई म्हणाली की ती ज्या शोमध्ये काम करत होती तोही अचानक बंद झाला होता. यामुळे ती रस्त्यावर आली होती. ती २० रुपयांमध्ये जेवायची. तिचा घटस्फोट झाला होता व तिच्या या निर्णयावर कुटुंबीयही नाराज होते. ते रश्मीलाच दोष देत होते. रश्मीची अवस्था इतकी बिकट झाली होती की ती रस्त्यावर कारमध्ये दिवस काढत होती. परिणामी तिला मानसिक ताण येऊ लागला आणि ती नैराश्यात गेली. यामुळे तिला सोरायसिस नावाचा आजारही जडला होता.

“मी खूप घाबरले होते, पण तो…”, मीनाक्षी शेषाद्रीने सांगितलेला सनी देओलबरोबर किसिंग सीनचा अनुभव

जगणं नकोसं झालेलं – रश्मी देसाई

रश्मी देसाई म्हणाली, “मला सोरायसिस नावाचा आजार झाल्यावर वजन वाढू लागले, केस गळू लागले. माझा लूक खराब झाला. त्यामुळे लोक नकारात्मक टिप्पण्या करू लागले. या सगळ्यांचा परिणाम असा झाला की मला जगणं नकोसं झालेलं. मरण्याचे विचार यायचे, पण मी कोणतंही वाईट पाऊल उचललं नाही. मी हिंमत न हारता या कठीण काळातून बाहेर पडले.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashami desai divorce depression 3 crore debt says stayed on streets hrc
Show comments