‘उतरन’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेत तपस्याची भूमिका साकारून अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai) घराघरात प्रसिद्ध झाली. ती तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आजवर रश्मीच्या आयुष्यात दोन अभिनेत्यांची एंट्री झाली पण तिची दोन्ही नाती टिकली नाही. तिचं लग्न पाच वर्षातच मोडलं, नंतर ती एका रिलेशनशिपमध्ये होती पण ते नातंही संपलं. लग्न, घटस्फोट आणि ब्रेकअपनंतर ती आता पूर्णपणे एकटी आहे. आता रश्मी एका चांगल्या जोडीदाराच्या शोधात आहे, तिला कसा जोडीदार हवा आहे याबाबत तिने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रश्मी देसाईने अभिनेता पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी जोडीदारामध्ये कोणते गुण हवे याबाबत तिने माहिती दिली. या पॉडकास्टमध्ये रश्मीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत सांगितलं. सध्या मी लग्न व अफेअर याबाबतीत खूप संघर्ष करत आहे, कदाचित लग्न माझ्या नशिबातच नाही असं ती म्हणाली. इतकंच नाही तर ‘मिस्टर राईट’ अजून तिच्या आयुष्यात आलेला नाही असंही तिने सांगितलं.

हेही वाचा – पूर्वाश्रमीच्या पतीच्या साखरपुड्यानंतर मानसी नाईकची पहिली पोस्ट, शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

रश्मी देसाईला कसा जोडीदार हवाय?

रश्मी देसाईला वाटतं की ती जशी आहे तसंच तिला स्वीकारणारा कुणीतरी भेटावा. तिला तिचे निर्णय घेऊ देणारा जोडीदार हवा आहे. “मी निर्णय घेताना चुकत असेल तर मला समजावणारा असावा. मला काही नवीन काम करायचं असेल तर ते करण्यास प्रोत्साहन देणारा असावा. घर चालवणं व नाती सांभाळणं या बेसिक गोष्टी आहेत व या दोन्ही गोष्टी मला येतात. मला आयुष्यभर साथ देणारा चांगला जोडीदार हवा आहे. तो इंडस्ट्रीतला नसावा पण मला समजून घेणारा हवा आहे. आयुष्यभर साथ देणारा असेल तरच भेटावा नाहीतर नाहीच, कारण मी एकटी खूश आहे आणि मला लग्न करण्याची कोणतीही घाई नाही,” असं रश्मी म्हणाली.

“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव

अरहान खानमुळे घाबरली आहे रश्मी

एक्स बॉयफ्रेंड अरहान खानने (Arhaan Khan) माझ्यासोबत जे केलं, त्यामुळे मी घाबरले आहे असं रश्मीने सांगितलं. ‘अनेक लोक तुला अमेरिकेतही ओळखतात, मग तिथून लग्नाची मागणी आली नाही का?’ असं पारसने विचारल्यावर रश्मी म्हणाली, “मागच्या चार-पाच वर्षांत माझ्याबरोबर घडलेल्या घटनांनंतर मी इतकी घाबरले आहे की, कोणी जवळ यायचा प्रयत्न केला तरी मी त्यांना दूर करते.”

“मी खूप घाबरले होते, पण तो…”, मीनाक्षी शेषाद्रीने सांगितलेला सनी देओलबरोबर किसिंग सीनचा अनुभव

पाच वर्षांत मोडलं लग्न, दुसऱ्या नात्यात झाली फसवणूक

रश्मी देसाईला ‘उतरन’ मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. याच मालिकेदरम्यान ती सहकलाकार नंदिश सिंह संधूच्या (Nandish Singh Sandhu) प्रेमात पडली. दोघांनी २०११ मध्ये लग्न केलं. पण, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले व भांडणं होऊ लागली. त्यानंतर दोघांनी २०१६ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

रश्मी देसाई व तिचा पूर्वाश्रमीचा पती नंदिश सिंह संधू (फोटो – इन्स्टाग्राम)

रश्मी व नंदिशचा घटस्फोट (Rashmi Desai Divorce) झाल्यावर काही काळानंतर अरहान खान तिच्या आयुष्यात आला. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते पण ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यावर रश्मीला कळलं की अरहानने तिची फसवणूक केली आहे. अरहान आधीच विवाहित होता व त्याला मूल देखील होते, ही बाब कळताच रश्मीने त्याच्याशी ब्रेकअप केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmi desai finding partner after divorce from nandish sandhu break up with arhaan khan hrc