‘बिग बॉस १७’ मुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या खूप चर्चेत आहे. फॅमिली वीकमध्ये अंकिताच्या सासू रंजना जैन ‘बिग बॉस’च्या घरात आल्या होत्या. घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी विकी-अंकिताच्या लग्नाला आपला पाठिंबा नव्हता, अंकिताचा खर्च उचलावा लागतो, विकीने लग्न केलंय, तर त्याच्या नात्यातील अडचणी त्याने सोडवाव्यात आम्हाला त्यांच्याशी काही घेणं-देणं नाही, अशी अनेक विधानं केली. त्यांच्या या वक्तव्यावर बिग बॉस फेम अभिनेत्री रश्मी देसाईने नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रंजना जैन यांनी अंकिता व विकीच्या लग्नाबद्दल, नात्याबद्दल जे म्हटलं त्याचा खरपूस समाचार रश्मीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत घेतला. “माफ करा आंटी, पण अंकिताला कधीच हा शो करायचा नव्हता, तिने हा शो तिचं प्रेम विकी जैनसाठी केला. आणि खर्च उचलावा लागतो याचा काय अर्थ आहे? त्यांनी प्रेमविवाह केला आहे आणि त्यापूर्वीही ती रस्त्यावर नव्हती. ती अंकिता लोखंडे आहे. बिग बॉस तुमच्या मुलावर पैसा लावत असेल पण आमची मुलगीही खरं सोनं आहे. सगळ्यांच्या आपल्या समस्या असतात. पण तुम्हाला वाटत नाही का की त्यांचं लग्न टिकावं? प्रत्येक पती-पत्नीची भांडणं होतात. आणि हा शो अवघड आहे, दोन दिवसात तुमचे हे हाल आहेत, चार महिने काढल्यास तुम्हाला त्रास समजेल. मी तुमचा आदर करते, नेहमी करेन, पण इथे तुम्ही चुकताय,” अशी पोस्ट रश्मी देसाईने केली आहे.

अंकिता लोखंडे शोमध्ये वारंवार करते एक्स बॉयफ्रेंड सुशांतचा उल्लेख; तिच्या सासूबाई म्हणाल्या, “ती त्याचं नाव घेऊन…”

रश्मी देसाई पोस्ट

दरम्यान, ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत विकीच्या आईने सांगितलं की विकीने अंकिताशी लग्नाचा निर्णय घेतला, त्याला आपला पाठिंबा नव्हता. “विकीने अंकिताशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला आमचा पाठिंबा नव्हता. विकीने लग्न केलं आणि आता तो जबाबदारी घेण्यास तयार आहे. याच्याशी आमचा काहीही संबंध नाही,” असं त्या म्हणाल्या होत्या.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmi desai slams vicky jain mother over her statement on ankita lokhande in bigg boss 17 hrc