देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. ढोल-ताशाच्या गजरात अँटिलियाच्या राजाचं आगमन पाहायला मिळालं. विशेष म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव आहे. त्यामुळे मोठ्या धुमधडाक्यात अँटिलिया येथे गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

शनिवारी रात्री बॉलीवूड कलाकारांसह अनेक दिग्गज मंडळींनी अँटिलियाच्या राजाचं दर्शन घेतलं. सलमान खान, रेखा, करिना कपूर, सैफ अली खान, जान्हवी कपूर, काजोल, अ‍ॅटली, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, आशुतोष गोवारिकर, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी अशा अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी अंबानींच्या घराच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी राजकीय मंडळींनी देखील खास उपस्थितीत लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जुन अँटिलियाच्या राजाचं दर्शन घेतलं. तसंच यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे पाहायला मिळाल्या. यादरम्यानचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हिडीओ झाला आहे.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
Hina Khan
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हीना खानने शेअर केले रुग्णालयातील फोटो; म्हणाली, “उपचाराच्या या ठिकाणी…”
Aishwarya Rai Abhishek Bachchan Photo:
चेहऱ्यावर गोड हास्य अन् ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनबरोबर घेतला सेल्फी; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दोघांचा फोटो Viral
Salman Khan and Shah Rukh Khan attends Devendra Fadnavis Oath Ceremony
Video : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला बॉलीवूडकरांची मांदियाळी! भर गर्दीत शाहरुख-सलमानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’मध्ये होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री, जबरदस्त राडा घालायला येतोय रांगडा गडी, नेटकरी म्हणाले, “कोल्हापुरचा…”

‘व्हूमप्ला’ या इन्स्टाग्राम पेजवर रश्मी ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, रश्मी ठाकरे नीता अंबानी व राधिका मर्चंट यांच्याबरोबर फोटो काढताना पाहायला मिळत आहेत. रश्मी ठाकरेंच्या लूकने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रश्मी ठाकरे ( फोटो सौजन्य – व्ह्यूमप्ला इन्स्टाग्राम )

अँटिलियाच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी रश्मी ठाकरेंनी खास लूक केला होता. त्यांनी पिवळ्या रंगाची सिल्कची साडी नेसली होती. ज्यावर बारिक नक्षीकाम करण्यात आलं होतं. या पिवळ्या रंगाच्या सुंदर सिल्कच्या साडीवर रश्मी ठाकरेंनी गळ्यात हिरे आणि पाचूचा हार घातला होता.

हेही वाचा – Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो

हेही वाचा – दीपिका पादुकोण गणेश चतुर्थीच्या दिवशी देणार बाळाला जन्म, डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल, पाहा Video

राधिका मर्चंटच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

दरम्यान, रश्मी ठाकरेंबरोबर नीता अंबानी धाकटी सून राधिकाबरोबर हातात हात घालून फोटो काढताना दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी राधिका हात जोडून सर्वांना नमस्कार करताना पाहायला मिळत आहे. तिच्या या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रश्मी ठाकरे, नीता अंबानी आणि राधिकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

Story img Loader