रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘पुष्पा’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेली ‘श्रीवल्ली’ नॅशनल क्रश आहे. रश्मिकाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. रश्मिकाने नुकतीच ‘झी चित्रगौरव पुरस्कार’ सोहळ्याला हजेरी लावली.
‘झी मराठी चित्रगौरव पुरस्कार’ सोहळ्यात रश्मिकाने ‘चंद्रा’ या लावणीवर ठेका धरलेला पाहायला मिळाला. रश्मिकाने ‘चंद्रा’वर ठसकेबाज लावणी करत प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला. श्रीवल्लीच्या नखरेल अदाकारीने चाहत्यांची मनं जिंकली. झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यातील रश्मिकाचा ‘चंद्रा’ या लावणीवरील डान्स व्हिडीओ झी मराठीच्या ऑफिशिअल पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा>> “नाटू नाटूला माझ्यामुळे ऑस्कर मिळाला” अजय देवगणचं ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये वक्तव्य, म्हणाला…
‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील लोकप्रिय ‘चंद्रा’ या गाण्यावर रश्मिकाने सादर केलेल्या ठसकेबाज लावणीचा व्हिडीओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. ‘चंद्रा’ गाण्यावर डान्स करताना रश्मिकाने मराठमोळा लूक केलेला पाहायला मिळाला. पांढऱ्या व गुलाबी रंगाची नऊवारी साडी, केसांत गजरा व नाकात नथ अशा मराठमोळ्या पारंपरिक वेशात रश्मिका दिसली.
हेही वाचा>> Video: हाताने डोसा खाल्ल्याने शिव ठाकरेवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले “तू एकदम…”
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिकाने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. ‘सिता रामम्’, ‘वारिसू’, ‘पुष्पा’, ‘डिअर कॉम्रेड’, ‘भीष्मा’, ‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. ‘गुडबाय’ व ‘मिशन मजनू’ या बॉलिवूड चित्रपटांमध्येही रश्मिका झळकली आहे.