पाच पर्व सुपरहिट झाल्यानंतर आता ‘सूर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सहावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ असं या पर्वाचं नाव असेल. तर या आगामी पर्वामध्ये सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत स्पृहा जोशीच्या ऐवजी अभिनेत्री रसिका सुनील दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ढोलकीच्या तालावर’ या रिॲलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यावेळी या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन स्पृहा जोशी नाही तर रसिका सुनील करणार असल्याची घोषणा करण्यात आली. हे कळल्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. रसिका पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार असल्याने तिचे चाहते खुश झाले, तर दुसरीकडे स्पृहा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार नसल्याने काहींनी निराशा व्यक्त केली. तर याबरोबरच काही जणांकडून रसिका आणि स्पृहा यांची सूत्रसंचालिका म्हणून तुलना केली जात आहे. आता या सगळ्यावर रसिकाने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ‘सूर नवा ध्यास नवा’तील मॉनिटर आता दिसतो ‘असा’, दीर्घ काळानंतर झालेल्या भेटीचा फोटो शेअर करत स्पृहा जोशी म्हणाली…

‘लोकसत्ता ऑनलाईन’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “स्पृहाचं मला अर्थातच खूप कौतुक आहे. सूत्रसंचालनाचा तिचा एक वेगळा बाज आहे, एक वेगळी शैली आहे. पण या पर्वात केलेल्या बदलाची तशीच गरज आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कारण आवाज तरुणाईचा अशी थीम आहे आणि या पर्वात अनेक गाणी नव्या अंदाजात सदर केली जातील. त्यामुळे हा जो बदल केला गेला आहे तो त्या अनुषंगाने केला गेला आहे. पण हे सगळं करत असताना जुन्यालाही आम्ही धरून ठेवणार आहोत. त्यामुळे स्पृहाचा इसेन्सही मला या कार्यक्रमात मिस होऊ द्यायचा नाहीये. कारण मी स्वतः तिची खूप मोठी चाहती आहे आणि तिने या आधीच्या पर्वांचं सूत्रसंचालन खरोखर खूप छान केलं आहे. त्यामुळे मला आशा आहे की त्याचा समतोल साधत मी माझ्याकडून माझ्या व्यक्तिमत्वातलंही नवीन काहीतरी देऊ शकेन.”

हेही वाचा : रसिका सुनील करणार ‘सूर नवा ध्यास नवा’च्या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन, अनुभव शेअर करत म्हणाली, “पडद्यामागे सगळ्यांची…”

पुढे ती म्हणाली, “मला छान वाटतंय की या प्रतिक्रिया चांगल्या अर्थाने विभागल्या गेल्या आहेत. काही मला प्रोत्साहन देत आहेत, तर काहीजण स्पृहाला मिस करत आहेत. एखाद्या कलाकाराला ऑनस्क्रीन मिस करणं हे मी अगदीच समजू शकते. कारण काही वर्षांपूर्वी मीही एक मालिका सोडून गेले होते. मला असं वाटतं की कलाकार म्हणून तुम्हाला कधी ना कधीतरी याला सामोरं जावं लागतं आणि एका पॉईंटनंतर तुमच्या कामातून प्रेक्षकांकडून तुम्हाला ते प्रेम मिळवावं लागतं आणि मी तेच करत आहे.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasika sunil expresses her views about spruha joshi anchoring in sur nava dhyas nava rnv
Show comments