‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका चांगलीच गाजली. त्यामुळे या मालिकेचे तीन भाग पाहायला मिळाले. या मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. आता ‘रात्रीस खेळ चाले’मधील माई म्हणजेच अभिनेत्री शकुंतला नरे यांची आता ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री होणार आहे.

अभिनेत्री शकुंतला नरे या ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिन्ही भागांनंतर अनेक मालिकांमध्ये विविध भूमिकेत पाहायला मिळाल्या. काही महिन्यांपूर्वी त्या ‘सन मराठी’वरील ‘शाब्बास सुनबाई’ या मालिकेत झळकल्या होत्या. त्यानंतर आता त्या ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळणार आहेत. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Star Pravah Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Off Air
१२६१ भाग, ४ वर्षांचा प्रवास; ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ लोकप्रिय मालिका संपली! सेटवर ‘असं’ पार पडलं सेलिब्रेशन, कलाकार झाले भावुक
Pankit Thakker and his wife Prachi Thakker divorce
प्रसिद्ध अभिनेत्याचा २४ वर्षांचा संसार मोडला, २१ व्या वर्षी वयाने मोठ्या अभिनेत्रीशी कुटुंबियांचा विरोध पत्करून केलेलं लग्न
Tarak Mehta Fame Mandar Chandwadkar Wife
‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका, म्हणाली…
Namrata sambherao
“खूपच अभिमान वाटतो”, अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ सहकलाकाराचे केले कौतुक
It is impossible to put people with different views into one mold says actress Nivedita Saraf
भिन्न विचारांच्या व्यक्तींना एका साच्यात बांधणे अशक्य; अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे मत
Star Pravah New Serial Tu Hi Re Maza Mitwa
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता साकारणार खलनायक! म्हणाला, “विक्षिप्त स्वभावाचं पात्र…”

हेही वाचा – रणबीर कपूर-कतरिना कैफच्या ब्रेकअपवर आलिया भट्टनं सोडलं मौन, म्हणाली, “मी अनेक ठिकाणी…”

सर्वांच्या लाडक्या माईंची एन्ट्री लोकप्रिय मालिका ‘मन धागा धागा जोडते नवा’मध्ये होणार आहे. या मालिकेत त्या आनंदीच्या आजीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेत येताच क्षणी त्यांचा दरारा दिसणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये शकुंतला यांची झळक झाली आहे. मालिकेचा नवा प्रोमो ‘मराठी टीव्ही इन्फो’ या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – “बंद करू नका…”, ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका ऑफ एअर होतं असल्यामुळे प्रेक्षक नाराज, म्हणाले…

दरम्यान, अभिनेत्री दिव्या पुगावकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. आज (१९ डिसेंबर) या मालिकेचे २०० भाग पूर्ण झाले आहेत.

Story img Loader