टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाने तिचा बॉयफ्रेंड आणि मालिकेतील सह-कलाकार शिझान खानशी ब्रेकअप झाल्याने हे कठोर पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. तुनिषाच्या आईने तिच्या मृत्यूनंतर शिझानवर आरोप केले आहेत. दरम्यान, तुनिषाच्या आत्महत्येनंतर ती गरोदर असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ती गरोदर नसल्याचं आढळून आलंय. अशातच तिच्या मैत्रिणीने धक्कादायक दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“शिझानने माझ्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं अन्…”; तुनिषाच्या निधनानंतर आईचा आक्रोश

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तुनिषाची मैत्रिण राया लबीबने तुनिषा गर्भवती होती, असा दावा केला आहे. तुनिषा मृत्यूच्या वेळी गर्भवती नसेल, पण ती त्यापूर्वी गर्भवती होती आणि गर्भपात करण्यासाठी तिने गोळ्या खाल्ल्या होत्या, असा दावा रायाने केलाय. तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून ती गर्भवती नव्हती, हे स्पष्ट झालं आहे. पण तिची मैत्रिण राया लबीबने दावा केला आहे की ती यापूर्वी गर्भवती होती आणि गोळ्या खाऊन तिचा गर्भपात झाला असावा. “तुनिषा शर्मा गरोदर होती, अशी शक्यता आहे. कदाचित ती तिच्या मृत्यूच्या वेळी गरोदर नसावी, पण ती याआधी गरोदर राहिली असेल आणि गोळ्या खाऊन तिचा गर्भपात झाला असावा. मला नक्की माहीत नाही, पण तिला कशाची तरी खूप काळजी वाटत होती,” असा दावा रायाने केला आहे.

Tunisha Sharma Death: शिझान खानची सिक्रेट गर्लफ्रेंड कोण? तुनिषाच्या आत्महत्येत तिची भूमिका काय?

“तुनिषा शिझानवर खूप प्रेम करत होती. कदाचित ती आधी गरोदर होती आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. तिच्या प्रेग्नन्सीबद्दल मला शंभर टक्के खात्री नाही, परंतु त्याची शक्यता आहे. कारण ती गर्भवती असणं हेच तिच्या आणि शिझानमधील एवढ्या मोठ्या भांडणाचं कारण ठरू शकत होतं,” असंही रायाने म्हटलं आहे.

पालकांची भांडणं, सातव्या वर्षी घरमालकाकडून लैंगिक अत्याचार अन्… तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान खानने आयुष्याबद्दल केलेले धक्कादायक खुलासे

अभिनेत्री राया लबीब हा तुनिशाला गेल्या २-३ वर्षांपासून ओळखत होती. तुनिषा मागच्या काही दिवसांपासून उदार आणि चिंताग्रस्त वाटत होती, असा दावाही रायाने केला आहे.