RBI withdraw 2000rs: भारतीय रिझर्व्ह बँकने २ हजार रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी(१९ मे) रिझर्व्ह बँकने २ हजार रुपयांच्या बंदीचा निर्णय जाहीर केला. रिझर्व्ह बँकच्या या निर्णयानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता शार्क टँक इंडिया फेम अनुपम मित्तलने या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२ हजारांच्या नोटा वितरणातून बाद करण्याच्या निर्णयानंतर अनुपम मित्तलने ट्वीट केलं आहे. “दुसरं मोठं निवडणूक वर्ष जवळ येत आहे, दुसऱ्यांदा नोटबंदीचा निर्णय. हा पॅटर्न आहे की योगायोग?” असं म्हणत अनुपम मित्तलने मोदी सरकारवर टीका केली आहे. अनुपम मित्तलचं हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. त्याच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> “नोट छापने की मशीन” गाण्यावर किली पॉलचा डान्स, नेटकरी म्हणाले, “२ हजार रुपयांच्या नोटा…”

आरबीआयकडून २ हजार रुपयांच्या नोटासंबंधी बँकांना पत्रकाच्या माध्यमातून सूचना दिल्या आहेत. नागरिकांना त्यांच्याजवळ असलेल्या २ हजाराच्या नोटा बँकेत जाऊन बदलून घेता येणार आहेत. २३ मेपासून ते ३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या नोटा बदलता येणार आहेत.