स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. आज तिचा वाढदिवस आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असते. त्यापैकीच एक कारण म्हणजे तिची लव्हस्टोरी. चित्रपटांप्रमाणेच तिच्या खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरीही खूप फिल्मी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तिने २०१४ मध्ये वरद लघाटेशी लग्नगाठ बांधली. त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. लग्नाच्या आधी जवळपास सहा वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. काही मुलाखतींमध्ये स्पृहाने त्यांची लव्हस्टोरी सर्वांना सांगितली होती.
आणखी वाचा : स्पृहा जोशी: कवितेच्या गावा नेणारी अभिनेत्री
‘लोकसत्ता कॅम्पस मूड’ या पुरवणीसाठी ते दोघं कॉलेज रिपोर्टर म्हणून काम करत होते. तेव्हा वरद कॉलेज पास आऊट झाला होता आणि तो ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये इंटर्नशिप करत होता. तर स्पृहा कॉलेजमध्ये होती. काही दिवसांनी वरद स्पृहाचा बॉस म्हणून कॅम्पस मूडच्या टीममध्ये परत आला. त्यावेळी लिहिलेल्या सगळ्या बातम्या तिला वरदकडून तपासून घ्याव्या लागायच्या, सगळे विषय त्याच्याबरोबर बोलून घ्यावे लागायचे. तेव्हाच स्पृहाला वरद अजिबात आवडायचा नाही. याचं कारण म्हणजे वरद इंग्रजी माध्यमातून शिकलेला मुलगा. त्याचं लिखित मराठी तितकं चांगलं नव्हतं. तो त्याचे लेख त्याच्या वडिलांकडून मराठीत पेपरवर उतरवून घ्यायचा. त्यामुळे तेव्हा स्पृहाला असं वाटायचं की, ज्या मुलाला स्वतःची आर्टिकल्स स्वतः लिहिता येत नाहीत तो मला का सांगणार मी काय आणि कसं लिहायचं.
तर दुसरीकडे, वरदला असं वाटायचं की स्पृहा कोणाच्यातरी वशिल्याने तिथे काम करत आहे. तिचा मनोरंजन सृष्टीशी, मीडियाशी काही संबंध आहे याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. पण त्यानंतर एका कॅम्पेनसाठी त्यांना जबरदस्तीने एकत्र काम करावं लागलं. त्यादरम्यान त्यांच्यात बोलणं वाढलं आणि मैत्री झाली. तर कालांतराने त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. तेव्हा स्पृहाला अभिनेत्री म्हणून करिअर करायचं आहे हे तिचं नक्की नव्हतं. ती यूपीएससीचा अभ्यास करत होती. तर वरदला मनोरंजन सृष्टीत काम करणारी मुलगी बायको म्हणून नको होती. जेव्हा स्पृहाने अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय बदलला सांगितलं तेव्हा तो थोडा गडबडला. त्याने विचार करण्यासाठी थोडा वेळ घेतला, त्या काळामध्ये सुरुवात आणि वरद यांच्यामध्ये त्यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली आणि अखेर वरदने स्पृहाबरोबर त्याचं असलेलं नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला. तर आता त्यांच्या सुखी संसाराला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत.