बिग बॉस हा टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. सुरुवातीला फक्त हिंदीत प्रसारित होणारा हा शो आता प्रादेशिक भाषांमध्येही सुरू झाला आहे. नुकताच बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडला. त्याच दिवशी बिग बॉस १८ चे प्रिमिअर झाले. तर त्याच्या एक आठवडाआधी बिग बॉस कन्नड ११ सुरू झाले. बिग बॉस कन्नडच्या ११ व्या पर्वाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

अभिनेता किच्चा सुदीप होस्ट करत असलेल्या बिग बॉस कन्नडने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. २९ सप्टेंबर रोजी हा शो सुरू झाला, त्यादिवशी या शोला ९.९ रेटिंग मिळाले. या पर्वाने आधीच्या सर्व पर्वाच्या टीआरपीचे रेकॉर्ड मोडत ऐतिहासिक रेटिंग मिळवले आहे. या शोला ग्रँड प्रिमिअरच्या दिवशीच प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यश आलं. शोची यंदाची थीम ‘स्वर्ग व नरक’ अशी आहे.

हेही वाचा – “लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर कबुली दिल्यावर अंकिताने सांगितला किस्सा, म्हणाली…

किच्चा सुदीप पुन्हा बिग बॉस कन्नड होस्ट करणार नाही, हा तो होस्ट करत असलेला शेवटचा सीझन आहे. त्याने एक पोस्ट करून यासंदर्भात घोषणा केली आणि चाहत्यांना धक्का बसला. “हा ११ वर्षांचा प्रवास खूप छान होता. पण आता मला ज्या गोष्टी करायला आवडतात, त्या करण्याची वेळ आली आहे. बिग बॉस कन्नडसाठी होस्ट म्हणून हा माझा शेवटचा सीझन असेल. इतकी वर्षे कलर्स आणि बिग बॉस फॉलो करणारे माझ्या या निर्णयाचा आदर करतील असा मला विश्वास आहे,” असं किच्चा सुदीपने लिहिलं.

हेही वाचा : Bigg Boss 18: बिग बॉसला पहिल्याच आठवड्यात अडचणीत आणणारा सदस्य घराबाहेर, कोण आहे तो? जाणून घ्या

कर्नाटक महिला आयोग अन् पोलिसांची नोटीस

बिग बॉस कन्नडच्या ११ व्या पर्वात एक टास्क खेळण्यात आला. त्यात स्पर्धकांना वेगवेगळ्या गटात विभागून त्यांना वेगळं ठेवण्यात आलं. यापैकी काही स्पर्धकांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. महिला आयोगाच्या तक्रारीनुसार, या टास्कमध्ये महिलांच्या गोपनियतेचे उल्लंघन करण्यात आले. आज तकने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, महिला स्पर्धकांना पुरुष स्पर्धकांबरोबर बाथरूम शेअर करावे लागले. कारण त्यांना नरकाची शिक्षा देण्यात आली होती. स्पर्धकांच्या पोषण आणि स्वच्छतेची योग्य काळजी घेण्यात आली नाही.

Bigg Boss 18: बिग बॉसला पहिल्याच आठवड्यात अडचणीत आणणारा सदस्य घराबाहेर, कोण आहे तो? जाणून घ्या

कर्नाटकमधील महिला आयोग व पोलिसांनी या शोविरोधात नोटीस जाहीर केल्यावर पोलिसांनी निर्मात्यांना शोचे एडिट न केलेले व्हिडीओ व ऑडिओ मागितले आहेत. तसेच पाच महिला स्पर्धकांचे जबाब नोंदवण्यात आले, ज्यात या महिलांनी मानवाधिकाराच्या उल्लंघनाची बाब नाकारली आहे. टास्कमध्ये ज्या गोष्टी घडल्या, त्या सहमतीने घडल्याचं या महिला स्पर्धक म्हणाल्या.