‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात. या कार्यक्रमाच्या अनेक स्किटमधील कोहली फॅमिली ही प्रचंड लोकप्रिय आहे. या स्किटवर एका चाहत्याने धम्माल रॅप तयार केलं असून त्यावर अनेकांनी रिल्स शेअर केले आहेत आणि आता याची भुरळ रेमो डिसूझालाही पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेमो डिसूझाच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो त्याच्या सहकाऱ्यांबरोबर ‘अवली लवली कोहली’वर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ प्राची त्यागीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रेमो डिसूझा त्याच्या हटके स्टाइलमध्ये या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर रेमो डिसूझाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून त्यावर अनेक युजर्ससह स्वतः रेमो डिसूझानेही कमेंट केली आहे. व्हिडीओवर कमेंट करताना रेमोने लिहिलं, “खूप मज्जा आली” याशिवाय इतर अनेक कलाकार आणि सेलिब्रेटींनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा- Video: “मी अवली लवली…” ‘हास्यजत्रे’च्या कोहली फॅमिलीचा व्हिडीओ पाहून मंजिरी ओकने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, फोटो व्हायरल

महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या स्किटमधील कोहली फॅमिलीही प्रचंड लोकप्रिय आहे. या स्किटमधील सगळ्या पात्रांची नावे आणि संवादाचा शेवटही ‘ली’ या अक्षरानेच होतो. समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, नम्रता संभेराव व प्रियदर्शनी हे कलाकार अचूक टायमिंग साधत या स्किटद्वारे विनोदनिर्मिती करतात. त्यांच्या या स्कीटवर केलेल्या धम्माल डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remo dsouza funny dance on maharashtrachi hasyajatra kohli family video mrj