Reshma Shinde : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय नायिका म्हणून रेश्मा शिंदेला ओळखलं जातं. अभिनेत्रीने काही आठवड्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर अचानक केळवणाचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाचा सुखद धक्का दिला होता. यानंतर रेश्माचा होणारा नवरा कोण आहे, तिचं सासर कुठे आहे अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. अखेर हळदी समारंभ पार पडताना रेश्माने तिच्या नवऱ्याचं नाव सर्वांसमोर रिव्हिल केलं. रेश्मा शिंदे आणि पवनचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेश्मा ( Reshma Shinde ) आणि पवनच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील बरीच मंडळी उपस्थित राहिली होती. अभिनेत्रीने लग्नात आधी मराठमोळा आणि त्यानंतर दाक्षिणात्य लूक केल्याचं पाहायला मिळालं होतं. यावरून रेश्माचा नवरा साऊथ इंडियन असावा अशी चर्चा चालू होती. अखेर ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत रेश्माने पवन हा साऊथ इंडियन असून तिचं सासर बंगळुरुला असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा : ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती, म्हणाली…

रेश्माने सासरी बनवले ‘हे’ पदार्थ

रेश्माला ( Reshma Shinde ) लग्नानंतर सासरी गेल्यावर तिने पहिला पदार्थ कोणता बनवला होता? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, “तिथे सगळे केळीच्या पानावर जेवतात. मी जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा माझं असं झालं, अरे रोज सगळे केळीच्या पानावर जेवण करतात. कारण, त्यांच्या इथे रोज पंचपक्वान्न असतात खूप सुंदर जेवण असतं. पहिल्या दिवशी मी सासरी कोबीची भाजी, पुलाव राइस, सांबर राइस बनवला होता. याशिवाय फ्लॉवर-मटरची आणि भेडींची भाजी बनवली होती. याचबरोबर बीटाची कोशिंबीर सुद्धा सर्वांसाठी केली होती.”

“साऊथच्या जेवणात मी पहिल्याच दिवशी मराठी तडका लावला होता.” असं रेश्माने सांगितलं. तसंच पुढे, पवनला मराठी पदार्थ कोणकोणते आवडतात याबद्दल विचारलं असता, अभिनेत्री म्हणाली, “पवनला माझ्या आईच्या हातची शेवभाजी फार आवडते. याशिवाय सुमीतची ( घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील हृषिकेश ) आई आणि बायको सुद्धा खूप सुंदर शेवभाजी बनवतात. पवनला आपल्याकडची मटकीची भाजी सुद्धा फार आवडते.”

हेही वाचा : “फ्लावर समझा क्या…”, म्हणत मराठी अभिनेत्रींचा ‘पुष्पा २’च्या गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “सोना-मोना…”

दरम्यान, रेश्मा शिंदेच्या ( Reshma Shinde ) लग्नाला मनोरंजन सृष्टीतले अनेक कलाकार उपस्थित होते. थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर आता पुन्हा एकदा अभिनेत्री कामावर परतली आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत सध्या ती जानकी हे पात्र साकारत आहे. येत्या काळात जानकीच्या आयुष्यात काय-काय ट्विस्ट अँड टर्न्स येणार, रणदिवे कुटुंबीय पुन्हा एकदा जानकी-हृषिकेशला स्वीकारणार का? या सगळ्या गोष्टी मालिकांच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reshma shinde cooked this food items for first time in pavans home after marriage sva 00