Reshma Shinde Dance Video : अलीकडच्या काळात दिवसभरात तब्बल १० ते १२ तास मालिकांचं शूट चालतं. त्यामुळे सेटवर असणाऱ्या सगळ्या कलाकारांचं आपआपसांत एक वेगळं बॉण्डिंग तयार होतं. हे सगळे कलाकार एकत्र पार्टी करतात, अनेकदा मोकळ्या वेळेत रील्स शूट करणं, डान्स व्हिडीओ बनवणं या गोष्टी प्रत्येक मालिकांच्या सेटवर सुरू असतात. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत एकमेकींच्या जावा असणाऱ्या रेश्मा शिंदे आणि ऋतुजा कुलकर्णी यांचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत रेश्मा शिंदेने ‘जानकी रणदिवे’ तर, ऋतुजा कुलकर्णीने ‘अवंतिका’ ही भूमिका साकारली आहे. या दोघी ऑनस्क्रीन एकमेकींच्या जाऊबाई आहेत. तर, ऑफस्क्रीन खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. रेश्मा आणि ऋतुजा नुकत्याच एका व्हायरल गाण्यावर थिरकल्या आहेत.

हेही वाचा : “प्रिय रसिक-मायबाप, मराठी चित्रपटसृष्टीला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची प्रेक्षकांना भावनिक साद, म्हणाला…

सध्या सोशल मीडियावर विविध गाणी ट्रेंड होत आहेत. यापैकी ‘रानी के फुंदरा’ या गाण्यावर रेश्मा आणि ऋतुजा यांनी जबरदस्त डान्स केला आहे. ‘सुक्कवा’ या अल्बममधलं हे गाणं आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये हा छत्तीसगढ़ी भाषेतील अल्बम लॉन्च करण्यात आला होता. रेश्माने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “प्रत्येक गाणं काहीतरी गोष्ट सांगतं…” असं लिहिलं आहे. शिवाय व्हिडीओवर हॅशटॅग देत अभिनेत्रीने हा २०२५ चा पहिला रील व्हिडीओ आहे असंही सांगितलं आहे. रेश्मा आणि ऋतुजा या दोघींची जबरदस्त एनर्जी यामध्ये पाहायला मिळत आहे.

नेटकरी सुद्धा या दोघींचा डान्स पाहून थक्क झाले आहेत. २४ तासांच्या आत या डान्स व्हिडीओला १२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “ठुमकेश्वरी”, “तुमचा विषयच लय हार्ड आहे”, “जोडी जमली गं”, “क्यूट जानकी आणि अवंतिका”, “रेश्मा ताई खूपच सुंदर” अशा प्रतिक्रिया देत चाहत्यांनी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : Video: कधी लाथ मारली, तर कधी चुमला फरफटवलं; विवियन डिसेनाचा आक्रमकपणा पाहून नेटकरी म्हणाले, “आम्ही तुझ्या पाठिशी…”

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रेश्मा शिंदे अभिनेता सुमीत पुसावळेसह प्रमुख भूमिका साकारत आहे. या दोघांशिवाय मालिकेत बालकलाकार आरोही सांबरे, प्रतीक्षा मुणगेकर, आशुतोष पत्की, सविता प्रभुणे, भक्ती देसाई, उदय नेने यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reshma shinde dances on chhattisgarhi song with onscreen costar watch video sva 00