Reshma Shinde Gruhapravesh : ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहुल’ या गाजलेल्या मालिकांमधून अभिनेत्री रेश्मा शिंदे घराघरांत लोकप्रिय झाली. छोट्या पडद्यावर तिचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रेश्माच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा चालू आहे. केळवण, मेहंदी, हळद हे लग्नाआधीचे विधी पार पडल्यावर रेश्मा २९ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकली.

रेश्माचा लग्नसोहळा आधी मराठमोळ्या पद्धतीने आणि त्यानंतर दाक्षिणात्य पद्धतीने पार पडल्याचं समोर आलेल्या फोटोंमधून स्पष्ट होत आहे. रेश्मा आणि पवन यांच्या लग्नाला कलाविश्वातील असंख्य कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तिच्या दोन्ही मालिकांच्या टीम यावेळी विवाहसोहळ्याला उपस्थित होत्या. रेश्माच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. अशातच लग्न पार पडल्यावर रेश्माच्या सासरकडच्या गृहप्रवेशाचा एक सुंदर व्हिडीओ आता समोर आला आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Lakhat Ek Aamcha Dada
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील तेजू-शत्रूने शेअर केला व्हिडीओ; अधोक्षज कऱ्हाडेच्या कमेंटने वेधले लक्ष, म्हणाला…
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ

हेही वाचा : Video: “कसे आहात पुणेकर?” दिलजीत दोसांझने कॉन्सर्टमध्ये मराठीत साधला संवाद, म्हणाला, “मुलगी शिकली…”

रेश्मा शिंदेचा सासरी ‘असा’ पार पडला गृहप्रवेश

रेश्मा शिंदेचा ( Reshma Shinde ) वाढदिवस २ डिसेंबरला साजरा करण्यात आला. या खास दिवशी पवनने बायकोसह देवदर्शन घेतानाचा फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या. यानंतर रात्री उशिरा रेश्माने तिच्या गृहप्रवेशाचा सुंदर असा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पवनच्या घरी रेश्माचं थाटामाटात स्वागत करण्यात आलं.

नव्या नवरीसाठी फुलांची सजावट, संपूर्ण बंगल्याला रोषणाई याशिवाय दारात सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. पवनच्या कुटुंबीयांनी अभिनेत्रीचं औक्षण केलं. यानंतर माप ओलांडून रेश्माचा नव्या घरात गृहप्रवेश झाला. यादरम्यान रेश्माचा नवरा पवनने तिचा हात घट्ट पकडून ठेवल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यामुळेच अभिनेत्रीने या गृहप्रवेशाच्या व्हिडीओला “गृहप्रवेश… पवनने ज्याप्रकारे माझा हात घट्ट पकडला होता” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : नागा चैतन्यशी लग्नगाठ बांधण्याआधी सोभिताने शेअर केले ‘पेल्ली कुथुरु’ समारंभाचे फोटो; ही तेलुगू प्रथा आहे तरी काय?

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री झळकणार नव्या चित्रपटात, पोस्ट करत म्हणाली, “तुमच्या आशीर्वादाची गरज…”

Reshma Shinde Gruhapravesh
रेश्मा शिंदेचं सासर ( Reshma Shinde Gruhapravesh )

दरम्यान, रेश्माच्या ( Reshma Shinde ) व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “सुंदर”, “सुंदर घर”, “खूप छान सासर आहे रेश्मा”, “घरातली माणसं सुद्धा तुझ्या सारखीच हसरी आणि गोड” अशा प्रतिक्रिया देत कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय मराठी कलाकारांनी सुद्धा या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. प्रतीक्षा मुणगेकर, विशाखा सुभेदार यांनी रेश्माला पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader