Reshma Shinde Haldi Ceremony : रेश्मा शिंदेच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या टीमने रेश्माचं पहिलं केळवण केलं होतं. यानंतर अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे या दोघींनी रेश्माचं दुसरं केळवण रेस्टॉरंटमध्ये साजरं केलं होतं. सोशल मीडियावर तिच्या केळवणाची चर्चा सुरू असतानाच बुधवारी रात्री मेहंदीचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने सर्वांना सुखद धक्का दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेश्मा शिंदेच्या ( Reshma Shinde ) घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे. अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा घरच्या घरी पार पडला. यावेळी तिच्या हातावरच्या मेहंदीमध्ये लग्नाची तारीख स्पष्टपणे दिसली. यावरून २९ नोव्हेंबरला अभिनेत्री लग्न करणार असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता मराठमोळ्या संस्कृतीनुसार लग्नाच्या एक दिवस आधी रेश्माचा हळदी सोहळा पार पडला आहे.

हेही वाचा : ब्रेकअपनंतर मलायका अरोरा झाली बिझनेसवुमन! ‘या’ खास व्यक्तीबरोबर पार्टनरशिप, ९० वर्षे जुन्या बंगल्यात सुरू केलं रेस्टॉरंट

रेश्माला हळद लागल्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केळवण सुरू झाल्यापासून अभिनेत्रीने तिचा होणारा नवरा नेमका कोण आहे याबाबत कोणतीही माहिती उघड केली नव्हती. मात्र, नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रेश्माच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक स्पष्टपणे दिसत आहे.

रेश्मा ( Reshma Shinde ) आणि तिच्या नवऱ्याने हळदी समारंभासाठी Twinning केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने हळदीसाठी खास दाक्षिणात्य लूक केला होता. हळदी रंगाचा लेहेंगा, त्यावर कॉन्ट्रास हिरवा पदर, फुलांचे दागिने, मोकळे केस या लूकमध्ये रेश्मा खूपच सुंदर दिसत होती. तर, तिच्या होणाऱ्या नवऱ्याने पिवळ्या रंगाचा सदरा घातल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ३ तास २१ मिनिटं; ‘Pushpa 2’ ठरणार सर्वाधिक लांबीचा चित्रपट? ॲडव्हान्स बुकिंगची तारीख ठरली…; चित्रपटाचं बजेट किती?

हेही वाचा : Video : सुनांची अट ऐकून एजे पडणार धर्मसंकटात; ‘नवरी मिळे हिटलरला’चा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिला ‘हा’ सल्ला, म्हणाले…

दरम्यान, रेश्मा शिंदेने ( Reshma Shinde Haldi ) अद्याप तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केलेले नाहीत किंवा त्याचं नावंही उघड केलेलं नाही. आता अभिनेत्री तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल केव्हा खुलासा करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याला तिचे जवळचे मित्रमंडळी व कलाविश्वातील अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reshma shinde haldi ceremony first glimpse of her husband video viral sva 00