Reshma Shinde & Harshada Khanvilkar : ‘झी मराठी’ वाहिनीवर नुकतीच ‘लक्ष्मी निवास’ ही नवीन मालिका सुरू झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर २३ डिसेंबरपासून ‘लक्ष्मी निवास’ ही बहुप्रतीक्षित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर लक्ष्मी ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तर, श्रीनिवासच्या भूमिकेत तुषार दळवी झळकत आहेत. हर्षदा यांनी यापूर्वी ‘रंग माझा वेगळा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘पुढचं पाऊल’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. इंडस्ट्रीतील जवळपास सगळ्याच कलाकारांबरोबर त्यांची घट्ट मैत्री आहे. याशिवाय त्यांच्या जुन्या मालिकांमधले कलाकार देखील त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतात.

हेही वाचा : “आमचा सांता जाऊन १९ वर्षे…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत पोस्ट; म्हणाले, “पप्पा असताना…”

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील हर्षदा खानविलकर यांची सहकलाकार रेश्मा शिंदेने ‘लक्ष्मी निवास’ या नव्या मालिकेसाठी त्यांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. याची पोस्ट अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. मालिकेत पहिल्याच दिवशी ‘लक्ष्मी’ या व्यक्तिरेखेचा वाढदिवस असतो असं दाखवण्यात आलं होतं. यानुसार रेश्माने ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा लक्ष्मी’ असं कार्डावर लिहित आपल्या लाडक्या हर्षदा ताईसाठी खास भेटवस्तू पाठवली होती.

रेश्माने या भेटवस्तूसह हर्षदा खानविलकर यांच्यासाठी एक खास पत्र देखील लिहिलं आहे. रेश्मा लिहिते, “तुझ्यातली लक्ष्मी आम्ही प्रत्यक्षात अनुभवली! आजपासून तिला पडद्यावर सगळे पाहतील… खूप भारी वाटतंय. Happy Birthday लक्ष्मी! आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे…Enjoy! तुला माहिती सुद्धा नाही इतकं प्रेम आहे माझं तुझ्यावर…तुझी आगाऊ मुलगी रेश्मा शिंदे.” या पत्राचा आणि गिफ्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत हर्षदा खानविलकर यांनी रेश्माचे आभार मानत यावर ‘लव्ह यू’ असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

Reshma Shinde
रेश्मा शिंदेचं हर्षदा खानविलकर यांना खास गिफ्ट ( Reshma Shinde )

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये हर्षदा खानविलकर, निखिल राजेशिर्के, सौरभ गोखले, कुणाल शुक्ला, अनुज ठाकरे, तुषार दळवी, स्वाती देवल, मीनाक्षी राठोड, तन्वी कोलते, अक्षया देवधर, महेश फाळके, दिव्या पुगावकर, राजेश शृंगारपुरे, राधिका बर्वे असे सगळे लोकप्रिय कलाकार झळकत आहेत.

Story img Loader