लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे(Reshma Shinde) काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत आहे. २९ नोव्हेंबर २०२४ ला तिने लग्नगाठ बांधली. तिच्या नवऱ्याचे नाव पवन आहे. लग्नाआधीपासूनच विविध कार्यक्रमांमुळे त्यांचे लग्न चर्चेत राहिले. ‘रंग माझा वेगळा’च्या तिच्या कलाकार मित्रांनी केलेलं केळवण असो किंवा ‘लगोरी’ मालिकेतील मैत्रिणींबरोबरचे व्हिडीओ असोत; एकंदरीत रेश्मा शिंदे मोठ्या चर्चेत होती. आता अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ
रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर तिच्या हळदीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रेश्मा व पवन त्यांच्या जवळच्या व्यक्तींबरोबर दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये फुलांची सजावट केली असल्याचे पाहायला मिळत आहे. रेश्मा व पवन आनंदी दिसत असून, ते कधी एकमेकांना हळद लावताना, कधी एकमेकांवर फुले उधळताना, तर कधी एकत्र डान्स करताना दिसत आहेत. रेश्मा तिच्या हळदी समारंभात मजा करीत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
रेश्माने हळदीचा हा खास व्हिडीओ शेअर करताना ‘माझी हळद’ अशी कॅप्शन दिली आहे. त्याबरोबरच नवऱ्याच्या अकाउंटला टॅगदेखील केले आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स करीत प्रेमाचा वर्षाव केला आहे.
नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या कमेंट्स केल्याचे दिसत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “एकमेकांसाठी बनलेले.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “तुम्हीसुद्धा आता लवकर आमचं कन्नड शिका.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “रेश्माताई, खूप सुंदर दिसत आहेस.” तर, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. चाहत्यांबरोबरच अभिज्ञा भावेनेदेखील इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.
रेश्मा शिंदेच्या कामाबद्दल बोलायचे, तर सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ या स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. जानकी असे तिच्या पात्राचे नाव आहे. आदर्श सून, पत्नी व आईच्या भूमिकेतून ती प्रेक्षकांची मने जिंकून घेत असल्याचे दिसते. सध्या तिची जाऊ ऐश्वर्या हिच्या कटकारस्थानामुळे जानकीला तिच्या पती व मुलीसह घरातून बाहेर पडावे लागले आहे. मात्र, तरीही तिची कुटुंबाप्रतिची आस्था कायम असल्याचे दिसते. त्याबरोबरच पतीलादेखील ती कायम साथ देत असल्याचे दिसते. आता ऐश्वर्याचे सत्य घरच्यांसमोर कधी येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.