Marathi Actress Reshma Shinde Wedding Date : ‘घरोघरी मातीच्या चुली’मधली जानकी असो किंवा ‘रंग माझा वेगळा’मधली दीपा रेश्मा शिंदेने कायमच आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला. आता ही अभिनेत्री आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. रेश्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिचा घरी लग्नाआधीच्या विधींनी सुरुवात झाली असून नुकताच तिचा मेहंदी सोहळा पार पडला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेश्माच्या लग्नाची सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण, अद्याप अभिनेत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव गुलदस्त्यात ठेवलं आहे. तो नेमका कोण आहे? हे रेश्माने सोशल मीडियावर रिव्हिल केलेलं नाही. त्यामुळे रेश्मा नवऱ्याबद्दल केव्हा सांगणार याची प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे ती लग्न नेमकं किती तारखेला करणार याबद्दल तिच्या काही चाहत्यांनी कमेंट्समध्ये विचारपूस केली होती. त्याचं उत्तर आता समोर आलं आहे.

हेही वाचा : मेहंदी रंगली गं! रेश्मा शिंदे चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

रेश्माने ( Reshma Shinde ) तिच्या हातावर लग्नाआधी सुंदर अशी मेहंदी काढली आहे. यामध्ये सप्तपदी, सात वचनं, नवीन सुरुवात, सनई-चौघडे, नवीन वर-वधू याबरोबरच लग्नाची तारीख सुद्धा अभिनेत्रीने रिव्हिल केली आहे. रेश्माने हातावर रेखाटलेल्या डिझाइनमधील विशेष तारीख पाहून अभिनेत्री लग्न केव्हा करणार हे सुद्धा उघड झालं आहे.

रेश्माने तिच्या हातावरच्या मेहंदीमध्ये २९ नोव्हेंबर लिहून घेतल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आता २९ तारखेच्या शुक्रवारी रेश्मा लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार आणि तिचे मित्रमंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : शुभमंगल सावधान! लोकप्रिय अभिनेत्याने अभिनेत्री पूजा जोशीशी बांधली लग्नगाठ, थाटामाटात पार पडला सोहळा

हेही वाचा : हॉरर चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ भयपट आणि त्यातील एकापेक्षा एक भीतीदायक सीन्स पाहून उडेल थरकाप, वाचा यादी

Reshma Shinde Wedding Date

दरम्यान, रेश्मा शिंदेचं ( Reshma Shinde ) काही दिवसांपूर्वीच केळवण पार पडलं होतं. अभिनेत्रीचं पहिलं केळवण ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने केलं होतं. तर, तिचं दुसरं केळवण अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे यांनी केलं होतं. यांनी मिळून ‘लगोरी’ मालिकेत काम केलं होतं. तेव्हापासून यांची एकमेकींशी जिवलग मैत्री आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reshma shinde wedding date reveals in mehendi designs see photos softnews sva 00